पुणे : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडे राज्यातील ३९ आमदार त्यांचे भविष्य बघायला गेल्याचे पुढे येत आहे. यात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचाही समावेश आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपांचे खंडन नीलम गोऱ्हे यांनी केले. मी केलेल्या निरोपाच्या भाषणामुळे अनेकांना पोटदुखी झाली असून राजकारणातील हेतू साध्य न झाल्याने काहीजण आरोप करीत असून, पुरावे सादर करण्याचे आव्हानही त्यांनी दिले आहे.
राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींची उठबस अशोक खरात याच्याकडे होती हे आता लपून राहिलेले नाही. नीलम गोऱ्हे देखील मागच्या काळात मंत्रिपदासाठी खरात याला नाशिकच्या हॉटेलमध्ये येऊन भेटल्या होत्या, असा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केला. त्यांच्या याच आरोपांना उत्तर देण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेतली.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
मी गेल्या पाच दशकापासून सामाजिक, राजकीय जीवनात सक्रीय आहे. माझी कारकीर्द स्वच्छ, पारदर्शक राहिली आहे. माझ्यावर माझे आई- बाबा आणि आजोबांचे सुधारणावादी संस्कारांचा पगडा आहे. मी कधीही कुठल्याही बाबाबुवांना भेटायला जात नाही, तो माझा स्वभाव नाही. मी प्रबोधनकार ठाकरे यांचे हिंदुत्व मानते. मला अशोक खरात याचे कार्यालय माहिती नाही, मी कशाला कुठे जाऊ? असा सवाल करीत आरोप करणाऱ्यांनी पुरावे देऊन बोलावे, असे आव्हान गोऱ्हे यांनी दिले.
मी उपसभापती असल्याने माझ्या दौऱ्याचा प्रोटोकॉल ठरलेला असतो. त्यामुळे मी कुठे कुठे गेले, याचे फोटो व्हिडीओज समाज माध्यमांवर उपलब्ध असतात. मी आजवर कुठली ही गोष्ट लपवलेले नाही. पण खरातला मी भेटलेली नाही. गेल्या सहा वर्षात नाशिकमधील संबंधित हॉटेलमध्ये मी कधीच गेले नाही, असे सांगताना माझ्या विरोधातील केलेले सर्व आरोप कपोलकल्पित असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाले.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
पुणे महापालिकेत काहींना यश आले नाही. त्यामुळे काही जण निराश झाले आहेत. त्याच निराशेतून त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, असे सुषमा अंधारे यांचे नाव न घेता गोऱ्हे यांनी टीका केली. तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात मी कायदेशीर मार्ग अवलंबेन. एसआयटी चौकशी सुरू आहे, ज्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत, असेही गोऱ्हे म्हणाल्या. कारवाई सुरू असताना अशोक खरातवर का बोलल्या नाहीत? असा प्रश्न मला अनेक जण विचारीत आहेत. परंतु अधिवेशन सुरू असताना बोलले असते तर चौकशीत हस्तक्षेप झाला असता, असे कारण नीलम गोऱ्हे यांनी दिले.
मोठा दावा! अशोक खरात बड्या सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा…
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना समन्स; देवेंद्र फडणवीस म्हणाले…
भोंदू अशोक खरात याच्या सोबतची ओळख रूपाली चाकणकरांना चांगलीच भोवली अन् आता…
अशोक खरात याच्या बंगल्याचे रूप अमावास्येच्या रात्री पूर्णपणे पालटायचे; राजकीय नेते…
नरहरी झिरवळ यांचा तृतीयपंथीसोबतचा बेडवरील कथीत व्हिडिओ व्हायरल…
मोठा आरोप! रुपाली चाकणकर यांनी असंख्य महिलांना अशोक खरात याच्याकडे नेलं…
सनसनाटी आरोप! जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली…
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांचीही होणार चौकशी…
अशोक खरातचा बड्या उद्योगपतीला फोन; ती महिला झाली प्रेग्नंट…
रूपाली चाकणकर यांच्या बोटाला दुखापत कशी झाली? सीसीटीव्हीमध्ये मिळेल पाहायला…
अशोक खरात स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर जोड्या जुळवायचा अन्…
अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे यांनी घेतली उडी…
नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…
गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…
नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…
रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…
अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…
धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…
खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…
रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…
मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…
रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…
मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…
नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…