नाशिक : बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ याला नाशिक क्राइम ब्रांच युनिट 1 ने अटक केली आहे. संबंधित आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासादरम्यान तब्बल ५८ व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
संबंधित व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू असून, त्यामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नाशिक क्राइम ब्रांच युनिट 1 करीत आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
नाशिकमधील बहुचर्चित खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला क्राइम ब्रांच युनिट एकने अटक केली असून या मांत्रिकाच्या विरोधात एका महिलेने तक्रार दिली होती. धमकी देऊन आणि गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केलाचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने खरात उर्फ कॅप्टन याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात भोंदूगिरी करणाऱ्या खरात उर्फ कॅप्टन यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.
सरकारवाडा पोलिसांत संशयित अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. खरात याला आज (बुधवार) पहाटे ३ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. यासंदर्भात सध्या अधिक चौकशी सुरु आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ असून, त्याची सत्यता पडताळण्यात येत आहे.
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर अशोक खरात चर्चेत आला होता. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात. त्याचं खरं रुप समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.