नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि एसआयआरच्या निलंबनाची मागणी करत कॉकरोच जनता पक्षाच्या समर्थकांनी दिल्लीतील जंतर मंतर आणि कनॉट प्लेस येथे जमण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 150 जणांना ताब्यात घेतले आहे. या भागांतून आंदोलकांना हटवले जात आहे. अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापटी झाल्याचे दिसून आले.
दिल्लीत बीएसएफच्या जवानांसह 38 हजारहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर येणाऱ्या 250 मेल आणि एक्सप्रेस गाड्या आज (शनिवार) रद्द करण्यात आल्या आहेत. 45 मेट्रो स्थानके बंद करण्यात आली असून, 10 नजरकैद केंद्रे उभारण्यात आली आहेत. दरम्यान, इंडिया गेटच्या 4 किमी परिसरातील इंटरनेट सेवा शुक्रवार रात्री 10 ते आज रात्री 10 पर्यंत बंद राहणार आहे. दुसरीकडे दिल्लीच्या सीमांवर सिमेंट बॅरिकेड लावण्यात आली आहेत. ज्या पद्धतीने शेतकरी आंदोलनात दिल्ली पोलिसांकडून रस्त्यावर खिळे पसरवण्यात आले होते, त्याच पद्धतीने खिळे पसरले आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने शेतकरी आंदोलनात पोलिसांकडून शेतकऱ्यांना दमवण्याचा प्रयत्न झाला होता, त्याच पद्धतीने जेन झी आंदोलनात प्रकार सुरु आहे. अश्रुधुरांच्या नळकांड्या सुद्धा सोबत ठेवण्यात आल्या आहेत.
#WATCH | Delhi: Police maintain high security around Mohan Estate area ahead of the Cockroach Janta Party (CJP) protest today. Spike strips also installed here. https://t.co/PwCjc2g245
— ANI (@ANI) October 10, 2026
अभिजीत दीपके म्हणाले, “मला आश्चर्य वाटते की या देशाचे पंतप्रधान या देशातील तरुणांना, या देशातील लोकांना इतके का घाबरतात? तुम्हाला सर्व रेल्वे बंद करण्याची काय गरज होती? तुम्हाला सर्व मेट्रो बंद करण्याची काय गरज होती? इंटरनेट बंद केले आहे, रस्ते बंद केले आहेत. तुम्ही जम्मू आणि काश्मीरमधून लष्कराला बोलावून दिल्लीत तैनात केले आहे. तुम्ही नक्षलवादी भागातून सीआरपीएफच्या जवानांना बोलावून दिल्लीत तैनात केले आहे.”
दिल्ली-नोएडा सीमेवर वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू आहे, परंतु सुरक्षा व्यवस्था सतर्क आहे. अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी बीएनएसएसचे कलम 163 लागू आहे. पोलिसांसोबत बीएसएफदेखील तैनात करण्यात आले आहे. दिल्लीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जंतर मंतरसह अनेक भागांमध्ये ड्रोन तैनात करण्यात आले असून कडक पाळत ठेवली जात आहे. दिल्लीच्या काही भागांमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
View this post on Instagram
दिल्लीच्या काही भागांचे छावणीत रूपांतर करण्यात आले आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, राजधानीतील अंदाजे ४५ मेट्रो स्थानके बंद आहेत. दिल्लीत येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय, जंतर मंतरच्या ४ किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त लोकशाहीची हत्या करत आहेत – निवृत्त न्यायमूर्ती गोपाळ गौडांचा दावा
मेट्रो आणि ट्रेनवर पूर्णपणे बंदी घालता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले
…म्हणून एमपीएससी आंदोलन पुण्यातून मुंबईत हलवण्याची तयारी? मुंबईत कुठे जमणार हजारो विद्यार्थी?
One thought on “Video! सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, जेनझी रस्त्यावर अन् अनेकांची धरपकड…”