पुणे महानगरपालिकेसाठी भाजपनेही दिली कुख्यात गुंडाच्या पत्नीला उमेदवारी…

Share

पुणे : पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना AB फॉर्म देण्यात आल्यानंतर टिका होताना दिसत आहे. मात्र आता आणखी एक अशीच घटना समोर आली आहे, भाजपने कात्रजमध्ये आंबेगाव भागातील प्रभाग क्रमांक ३८ मधून कुख्यात गुंडाच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे.

कुख्यात गुंड रोहिदास चोरघेवर हत्येचे अनेक गुन्हे नोंद असून अपहरण, खंडणी, गोळीबार अशा गुन्ह्यांमध्ये तो आरोपी आहे. त्याची पत्नी प्रतिभा चोरघे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

रोहिदास चोरघे हा वेल्हे तालुक्यातील वांगणी गावचा असून त्याची वेल्हे तालुक्यात आणि पुणे शहरच्या दक्षिण भागात दहशत राहिली आहे. ७ फेब्रुवारी २००८ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता आणि इस्टेट एजंन्ट असलेल्या संदीप बांदलची हत्या केल्याचा गुन्हा रोहिदास चोरघे वर नोंद करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. ५ फेब्रुवारी २०११ला त्याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. पोलिसाला ढकलून त्याने पळ काढला होता. त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. फरारी असलेल्या रोहिदास चोरघ याने संदीप बांदल हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या अविनाश शिळीमकरला न्यायालयाच्या आवारात मारण्याचा कट रचला. साक्षीदार अविनाश शिळीमकर साक्ष देण्यासाठी फेब्रुवारी २०१२ ला पुणे सत्र न्यायालयात आला असता न्यायालयाच्या आवारातच चोरघे आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये अविनाश शिळीमकरचा मित्र विजय कारके जखमी झाला. त्यानंतर रोहिदास चोरघे फरार होता. फरार असतानाच त्याने पुणे-बेंगलोर महामार्गावर असलेल्या आणेवाडी टोल नाक्यावर बंदुकीतून गोळीबार करून दहशत निर्माण केली. त्यानंतर पोलिसांनी रोहिदास चोरघेला वांगणी या त्याच्या गावातून अटक केली.

अटक करण्यात आली त्यावेळी तो वांगणी गावचा सरपंच होता. अटकेनंतर त्याला राजीमाना द्यावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रोहिदास चोरघे त्याच्या नऊ उमेदवारांच्या पॅनलसह पुन्हा बिनविरोध निवडून आला. आता पत्नीच्या माध्यमातून तो राजकारणात प्रवेश करत आहे. संदीप बांदल हत्या प्रकरणात त्याची पुराव्यांच्या अभावी निर्दोष सुटका झालेली असली तरी गोळीबाराचे खटले अद्याप न्यायप्रविष्ठ आहेत.

पुण्याच्या टोळीयुद्धाचा ‘बकासूर’ निवडणुकीच्या रिंगणात, कोण आहे गुंड बापू नायर…

गुन्हेगारांना टायरमध्ये घाला अन् गुंडांच्या टोळ्यांमध्ये तिकीट वाटप…

पुणे महानगरपालिका निवडणकीसाठी पुणे भाजप उमेदवारांची पाहा संपूर्ण यादी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *