पुण्यातील गँगवॉर आता राजकारणातही; खुनाचा बदला घेण्यासाठी आईने भरला अर्ज…

kalyani-komkar-aandekar
Share

पुणे : पुणे शहरातील चर्चेत असलेल्या दोन टोळ्या यंदा निवडणुकीच्या रिंगणातही एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकणार आहेत. आंदेकर टोळीने हत्या केलेल्या आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर यांनी थेट सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांच्या विरोधात अपक्ष अर्ज दाखल केला आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मध्ये कल्याणी कोमकर यांनी अर्ज दाखल केला आहे.

अजित पवार यांनी जर आंदेकर कुटुंबीयांना उमेदवारी दिली तर आत्मदहन करेन असा इशारा कल्याणी कोमकर यांनी दिला होता. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर या दोघींनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर कल्याणी कोमकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आंदेकर विरुद्ध कोमकर हा गुन्हेगारीतला संघर्ष पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणार पाहायला मिळणार आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

आयुष कोमकरच्या आईने शिंदेच्या शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. मात्र ती उमेदवारी न मिळाल्याने मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी थेट कल्याणी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. कल्याणी कोमकर म्हणाल्या, “मी कोर्टात आंदेकर यांच्या विरोधात जाणार आहे. मला माहिती नाही, आंदेकर यांना कोण मदत करत आहे, पण राजकीय लोक मदत करतात, हे मात्र नक्की आहे. जर का त्यांना कोणीही तिकीट दिले, तर त्या पक्ष कार्यालयाबाहेर मी आंदोलन करेन.”

वनराज आंदेकर माझा भाऊ आहे, मी माझ्या भावाची सुपारी का देऊ, आम्ही असे काही केले नाही, तरी आम्ही भोगतोय. वनराज आंदेकरच्या हत्येत आमचा संबंध नाही, माझ्या मुलाचा, माझा कोणाशी वाद नव्हता. कोण असे का करेल? आंदेकरांना अपक्ष लढू द्या, पण पक्षाकडून नको. लोकांची घरे ते उध्वस्त करत आहेत, असा आरोप कल्याणी कोमकर यांनी केला आहे.

पुणे महानगरपालिकेसाठी भाजपनेही दिली कुख्यात गुंडाच्या पत्नीला उमेदवारी…

पुण्याच्या टोळीयुद्धाचा ‘बकासूर’ निवडणुकीच्या रिंगणात, कोण आहे गुंड बापू नायर…

गुन्हेगारांना टायरमध्ये घाला अन् गुंडांच्या टोळ्यांमध्ये तिकीट वाटप…

पुणे महानगरपालिका निवडणकीसाठी पुणे भाजप उमेदवारांची पाहा संपूर्ण यादी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *