भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, कार्यकर्त्यांनी अचानक धाड अन्…

political-leader
Share

धाराशिव: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा धुरळा उडाला असून, राजकीय वातावरणही तापू लागले आहे. मुंबईत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद असताना दुसरीकडे धाराशिवमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटपाच्या आरोपातून भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी उशिरा रात्री जोरदार राडा झाला. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. यामुळे कळंब शहरात खळबळ उडाली. प्रभाग क्रमांक सहा येथील भाजप उमेदवार सारिका वाघ यांच्या वतीने पैसे वाटप सुरू असल्याची माहिती मिळताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अचानक धाड टाकली. या दरम्यान सारिका वाघ यांचे पती रमेश वाघ हे पैसे वाटताना रंगेहात पकडल्याचा काँग्रेसचा दावा आहे. यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले. वादावादीनंतर जोरदार हाणामारी झाली. काँग्रेस उमेदवाराच्या मुलाने रमेश वाघ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

भाजपच्या आरोपानंतर काँग्रेसने भाजपवर पलटवार केला आहे. पैसे वाटपाला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर भाजपच्या 10 ते 15 जणांनी एकत्र हल्ला चढवल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार पांडुरंग कुंभार यांचा मुलगा राहुल कुंभार यांनी केला. या हल्ल्यात राहुल कुंभार हे जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर कळंबमध्ये झालेल्या या हाणामारीमुळे राजकीय वातावरण तापले असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.

Buy Political Social Media Book WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
WhatsApp : 93712 69949

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *