संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com
पुणे : पुणे शहरातील विविध भागांमध्ये गेल्या सहा महिन्यांत १७ हजार ६३९ तर दोन महिन्यांत तब्बल साडेसहा हजार नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे महानगर पालिका भटके श्वान नियंत्रणासाठी मोठा खर्च करत असेल तर श्वानांनी चावा घेतलेल्यांची संख्या एवढी कशी वाढू शकते? असा प्रश्न सुज्ञ पुणेकर विचारत आहेत.
पुणे मनपा हद्दीतील भटक्या व मोकाट श्वानांनी चावा घेतलेल्या रुग्णांच्या संख्येचा नायडू हॉस्पिटलकडून अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार जानेवारी २०२६ मध्ये ३४४८ तर फेब्रुवारी २०२६ मध्ये ३०५५ श्वानांनी चावा घेतला आहे. सप्टेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत १७ हजार ६३९ मोकाट श्वानांनी चावा घेतला आहे. दुसरीकडे नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यात आलेली आकडेवारीही समोर आली आहे. त्यानुसार एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान एकून ५४ हजार ७२० नसबंदी तर एक लाख ९४ हजार ८०१ लसीकरण करण्यात आले आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ अखेर एक लाख ५४ हजार ९६५ मोकाट व भटक्या श्वानांवर लसीकरण करण्यात आले आहे. यादरम्यान विशेष मोहिमेअंतर्गत एक लाख २१ हजार २१५ मोकाट व भटक्या श्वानांवर लसीकरण करण्यात आले आहे. तर ५४ हजार ७२० नसबंदी व शस्त्रक्रिय केलेली संख्या आहे. पुणे महानगर पालिकेकडून शहराच्या विविध भागांमध्ये भटक्या श्वानांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात नसबंदी आणि शस्त्रक्रिया केली जात असेल तर कुठेतरी गणित चुकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पुणे महानगरपालिका प्रशासनाने श्वानदंशाच्या घटनांची दखल घेत भटके श्वान पकडणे, नसबंदी आणि अँटी-रेबीज लसीकरण करत असल्याचे आकेडवारीवरून दिसत आहे. पशुवैद्यकीय विभागाकडून विशेष पथके तयार करण्यात आली असून, तक्रार आलेल्या भागांमध्ये तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी भटक्या श्वानांना चिडवू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये आणि श्वानदंश झाल्यास तात्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन लस घ्यावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. मात्र, वाढत्या घटनांमुळे भटके श्वान नियंत्रणासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून दररोज ठराविक भागांमध्ये भटके श्वान पकडले जात असून त्यांची नसबंदी, अँटी-रेबीज लसीकरण आणि वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडले जात आहे. या प्रक्रियेमुळे श्वानांची संख्या नियंत्रणात राहण्यास मदत होणार असून रेबीजचा धोका कमी होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. नागरिकांनी भटक्या श्वानांना त्रास देऊ नये, त्यांना अन्न देताना स्वच्छता पाळावी आणि आक्रमक श्वान आढळल्यास त्वरित महापालिकेला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
(क्रमशः)
पुणे शहरात दोन महिन्यात साडेसहा हजार जणांना चावले श्वान!https://t.co/8kxdBSWkRj@PMCPune @SunetraA_Pawar @Dev_Fadnavis @mieknathshinde @Pune @SantoshDhaybar pic.twitter.com/JxWcwnJkvM
— mahabharat news (@mahabharatnewss) April 29, 2026