विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट! भाजपने उघडला पत्ता…

Share

मुंबईः विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असून, ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने काँग्रेस पक्षात नाराजी आहे. त्यामुळे काँग्रेसनंही आता उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु केली आहे.

दिल्लीतून काँग्रेसचा एबी फॉर्म मुंबईला पाठविण्यात येणार आहे. श्रीनिवास बिक्कड फॉर्म घेऊन मुंबईला येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा होता तसाच पाठिंबा आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसला द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार असून त्यांची 10 मतं मिळवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे कळत आहे. उद्धव ठाकरे यांनीच पुन्हा ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेस आणि शरद पवार गटाची आग्रही भूमिका होती. मात्र मित्र पक्षांना याविषयी अंधारात ठेवण्यात आल्याचा सूर काँग्रेसने आळवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत राजकीय हेवेदावे सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

एकमेव जागेसाठी उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात, वादाची ठिणगी पडलेली असताना आता भाजपने विधान परिषद निवडणुकीत सातवा उमेदवार देण्यासाठी कंबर कसली आहे. भाजप अतिरिक्त उमेदवार देण्याबाबत केंद्रीय पक्ष पातळीवर चर्चा करण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीत अंतर्गत वाद सुरू झाला आहे आणि याच वादाचा फायदा उचलण्याच्या तयारीत भाजप आहे.

भाजपकडून विधानपरिषदेसाठी 6 उमेदवारांची नावं जाहीर…
भाजपने विधानपरिषदेसाठी 6 उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधानपरिषदांच्या जागेसाठी पाच नावांची घोषणा केली. तर, विधानपरिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी एक म्हणजेच एकूण 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, प्रज्ञा सावंत यांचा समावेश आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम…
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *