अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Share

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ या नावाने ईश्वरी प्रकाशनने पुस्तक तयार केले असून, पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील २५ लेखकांचे अनुभव आहेत. राज्यातील वेगवेगळ्या भागांमधील लेखकांनी दादांविषयी आपले अनुभव कथन केले आहेत.

ईश्वरी प्रकाशनच्या वतीने अजितदादांवरील अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन केले होते. या आवहनाला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ‘महाराष्ट्राचे दादा’ या नावाने पहिले पुस्तक तयार करण्यात आले आहे.

डॉ. सुवर्णा निंबाळकर, शिवाजी पाटील, दत्ता पायगुडे, डॉ. प्रकाश पांढरमिसे, डॉ. अशोक बालगुडे, सोनाली कापुरे-बिऱ्हाडे, धनश्री पवार, श्रृती पवार, भाग्यश्री आपेगांवकर, सुनिता नेराळे, अनिल चव्हाण, अर्जुन विष्णू जाधव, प्रशांत हिंगे, सुजित दिवेकर, प्रशांत अडसूळ, वेदांत ढगे-पाटील, राजेश धावारे, सुनील पांडे, सुहास गायकवाड, प्रकाश केंद्रे, युवराज गोपाळे, रितेश कांबळे, चंद्रशेखर हळेमनी, अनमोल गेडाम, सम्राट समाधान हनुमान या २५ लेखकांचे लेख पुस्तकामध्ये आहेत. ज्येष्ठ पत्रकार संतोष धायबर हे पुस्तकाचे संपादक आहेत.

‘महाराष्ट्राचे दादा’ या पुस्तकामध्ये अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, वैयक्तिक आठवणी, अनुभव, तसेच कामकाजातील प्रेरणादायी प्रसंग मांडण्यात आले असून, संग्राह्य असे पुस्तक आहे. पुस्तकाचे पुढील भागही प्रकाशित केले जाणार असून, त्यामध्ये नवीन लेखकांना लिहिण्याची संधी दिली जाणार आहे. प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी पुस्तक पोस्टेज खर्चासह २०० रुपयांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती ईश्वरी प्रकाशनच्या वतीने देण्यात आली.

अधिक माहितीसाठी संपर्क :
ईश्वरी प्रकाशन, पुणे
WhatsApp : 93712 69949
ई-मेल : ishwariprakashan@gmail.com

error: Not permitted !!