About Us

Santosh-Dhaybar
Share

संपादकाचा परिचयः
श्री. संतोष प्रभू धायबर गेली २८ वर्षे पत्रकारितेत आहेत. पुणे येथील दैनिक ‘सकाळ’मध्ये वरीष्ठ उपसंपादक म्हणून २२ वर्षे काम केले आहे. दैनिक ‘सकाळ’च्या विविध माध्यमांमधून त्यांनी समकालिन सामाजिक विषयांवर सातत्याने लेखन केले आहे. सोशल नेटवर्किंग माध्यमे, त्यांचा प्रसार, त्यांचा समाजावर झालेला परिणाम हे त्यांचे प्रामुख्याने अभ्यासाचे विषय होते. सामाजिक विषयावरील त्यांचे अनेक लेख, ब्लॉग प्रसिद्ध झाले आहेत. स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन त्यांनी रिपोर्टींग केले आहे. त्यांच्या विविध क्षेत्रातील अनेक बातम्या, लेख राज्यभर गाजले आहेत.

भारतीय लष्कर व जवान हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. पाकिस्तानच्या ताब्यात अडकलेले जवान चंदू चव्हाण यांच्या नावाची चर्चा २०१६ च्या अखेरीस सर्वाधिक झाली. श्री. धायबर यांनी ‘सकाळ’मधून सातत्याने चंदू चव्हाण यांचा विषयी बातम्या केल्या होत्या. चव्हाण यांनी पाकिस्तानच्या अंधारकोठडीत असह्य वेदना भोगल्या. चव्हाण भारतात परतल्यानंतर सर्वप्रथम श्री. धायबर यांनी त्यांची भेट घेऊन मुलाखत मिळविली. ती मुलाखत ‘सकाळ’, साम टीव्ही, ‘साप्ताहिक सकाळ’, सप्तरंग पुरवणीमध्ये प्रसिद्ध झाली आणि देशभर गाजली. श्री. धायबर यांची जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे तीन महिने २१ दिवस) या पुस्तकासह एकूण तेरा पुस्तके प्रकाशीत झाली आहेत.

– श्री. धायबर यांनी सकाळच्या www.esakal.com या ऑनलाईन आवृत्तीसाठी पहिल्या दिवसांपासून काम केले आहे.
– पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचे www.shirurtaluka.com हे संकेतस्थळ १५ वर्षांपूर्वी सुरू केले असून, मंत्रालय येथे मा. दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे.
– पोलिसांसाठी काम करणारी www.policekaka.com व राजकीय बातम्या लेख देणारी www.mahabharat.news या वेबसाईट सुरू केल्या आहेत.
– पुणे शहरातील www.puneganpati.com ही नव्याने वेबसाईट आणि ‘पुणे गणपती डायरी (२०२५-२६)’ सुरू केली आहे.
– सध्या चारही वेबसाईटच्या मुख्य संपादकाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
– संतोष धायबर यांनी लिहीलेली व संपादित केलेली तेरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
– ईश्वरी प्रकाशनने प्रकाशीत केलेल्या ‘विंम्बल्डनच्या हिरवळीवरून’ या पुस्तकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
– ईश्वरी प्रकाशनने प्रकाशीत केलेल्या व www.policekaka.com च्या पोलिसकाका विशेषकांचे श्री. संतोष धायबर संपादक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलिसकाका विशेषकांचे प्रकाशन झाले आहे.
– ईश्वरी प्रकाशनचे ते व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहात आहेत.

संतोष धायबर यांच्याकडे मुख्य संपादकाची जबाबदारी असलेल्या वेबसाईट:
www.puneganpati.com
www.policekaka.com
www.mahabharat.news
www.shirurtaluka.com

santosh-dhaybar-photo

संतोष धायबर यांनी लिहीलेली पुस्तकेः
१) ‘कर्मयोगी’ कुंडलिकराव (दादा)
२) जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे तीन महिने २१ दिवस) मराठी
३) जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे तीन महिने २१ दिवस) हिंदी
४) पोलिसकाका (पुणे शहर)
५) पोलिसकाका पुणे शहर भाग १
६) पोलिसकाका नाशिक शहर पोलिस
७) पुणे गणपती डायरी (२०२५-२६)
८) प्रेरणा
९) पोलिस कायदे आणि नागरिकांचे हक्क
१०) राजकीय नेता आणि सोशल मीडिया गाईडलाईन
११) महाराष्ट्राचे दादा
१२) पोलिस अधिकारी व्हायचंय?
१३) पोलिस स्टेशनची पायरी चढताना…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलिसकाका विशेषांकाचे प्रकाशन!

जवान चंदू चव्हाण यांचे पाकिस्तानमधील छळावरील पुस्तक जरूर वाचा. ऑनलाईन विकत घेण्यासाठी क्लिक करा…

जवान चंदू चव्हाण

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचे www.shirurtaluka.com या संकेतस्थळाची निर्मिती पत्रकार संतोष प्रभू धायबर यांनी केली आहे. 2011 मध्ये विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन विधानसभा येथे करण्यात आले.

Karmayogi Kundlikrao (Dada)

फेसबुकः https://www.facebook.com/santosh.dhaybar
ट्विटरः Santosh Dhaybar
ईमेलः santosh.dhaybar@gmail.com