पुणे: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज (शनिवार) पुणे दौऱ्यावर असून, आज होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाआधी पुण्यात मोठा राडा झाला आहे. या कार्यक्रमात राहुल गांधी देशभरातील युवकांशी संवाद साधणार आहेत. मात्र त्याच्या आधी काँग्रेस आणि एबीव्हीपीमध्ये गोंधळ झाला आहे. या ठिकाणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हेदेखील पोहोचले आहेत. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ परिसरात काँग्रेस-एनएसयूआय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाली आहे.
अभविपचे काही कार्यकर्ते सीओईपी कॉलेजच्या परिसरात आले आणि त्यांनी या ठिकाणच्या तरुणांना राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबाबत धमकावत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पुण्यातील आरटीओ कार्यालयाशेजारील एसएसपीएमएस मैदानावर 22 ऑगस्ट रोजी राहुल गांधींचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी कमीतकमी 10 हजार विद्यार्थी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
अभविपच्या गुंडांनी मुलींना धमकावलं, कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी दिली, असा आरोप देखील करण्यात येत आहे. तर काही विद्यार्थिंनीना मारहाण केल्याचा आरोप देखील काँग्रेसकडून करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या राड्यामुळे आता पुणे पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला आहे. कॉलेजमधून आम्हाला तीन वर्षांपासून स्कॉलरशीप मिळालेली नाही. हा मुद्दा आम्ही राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहोत. यानंतर अभविपच्या काही गुंडांनी या मुलींना धमकावलं, त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला जावू नये यासाठी त्यांना डांबून ठेवण्यात आले, असा आरोप देखील करण्यात आला आहे.