शरद पवार यांच्याकडून १० प्रवक्त्यांची यादी जाहीर; पाहा नावे…

sharad-pawar
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (शरद पवार) नव्या १० प्रवक्त्यांची यादी आज (शनिवार) जाहीर करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासह तरुण रक्ताचे अभ्यासू कार्यकर्ते अनिश गवांदे, महेबूब शेख, हेमाताई पिंपळे यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पक्षाची ध्येय धोरणे आणि बाजू सर्वसामान्य जनतेसोबतच माध्यमांमध्ये मांडण्याची जबाबजारी प्रवक्त्यांवर असणार आहे. दुसरीकडे रोहित पवार यांनी पक्षाच्या बैठकीला दांडी मारल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्ष संघटना आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील, माजी मंत्री अनिलजी देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार डॉ अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजी खासदार फौजियाताई खान, राजेंद्र शिंगणे, माजी आमदार ॲड. अशोकबापू पवार उपस्थित होते.

प्रवक्त्यांची नावे पुढीलप्रमाणे…
1. श्री. जितेंद्र आव्हाड
2. श्री. क्लाईड क्रास्टो
3. श्री. भीमराव हत्तीअंबीरे
4. श्री. अनिश गवांदे
5. अॅड. फैजल मिर्झा
6. श्री. महेबूब इब्राहीम शेख
7. श्री. प्रवीण कुंटे पाटील
8. श्री. प्रशांत सोनबा वीरकर
9. अॅड. हेमाताई पिंपळे
10. डॉ. चंद्रकांत बारेला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *