मुंबई: कृषी घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला होता. हायकोर्टापाठोपाठ आता लोकायुक्तांनी ही धनंजय मुंडे यांना दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या विरोधात निर्णय देऊ शकत नाही, असे म्हणत लोकायुक्तांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची तक्रार फेटाळली आहे.
२०२४ मधील कृषि विभागातील खरेदी आणि विक्री प्रकरणात धनंजय मंडे यांना जुलै २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयातून दिलासा मिळाला होता. या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या खरेदी आणि विक्री व्यवहारामध्ये धनंजय मुंडे यांचा हात नसल्याचे कोर्टाने नमूद केले होते. हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी घोटाळा प्रकरणात लोकायुक्तांकडे तक्रार केली होती.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
या तक्रारीवर आता लोकायुक्तांनी आपलं निरीक्षणं नोंदवले आहे. “कृषी खरेदी प्रकरणाबाबत: या संदर्भात उच्च न्यायालयाचा आदेश अस्तित्वात असल्याने, आणि संबंधित याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितलेली नसल्यानं, उच्च न्यायालयाचा आदेश लोकायुक्तांवर बंधनकारक आहे. त्यामुळे त्या आदेशाविरुद्ध लोकायुक्त कोणताही वेगळा आदेश देऊ शकत नाहीत, असे लोकायुक्तांनी स्पष्ट केले आहे. तसेच, ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ प्रकरणाबाबत भारतीय राज्यघटनेतील कलम १०२ व १०३ नुसार अपात्रतेबाबतचा निर्णय राष्ट्रपतींकडून घेतला जाऊ शकतो. त्यामुळे या बाबतीत चौकशी अथवा निर्णय देण्याचा अधिकार लोकायुक्तांकडे नाही, असे मतही लोकायुक्तांनी व्यक्त केले आहे.
महाजेनकोच्या ४० तक्रारींबाबत: सदर एफआयआर संदर्भात लोकायुक्त चौकशी करू शकत नसल्याचे सांगून, आवश्यक असल्यास दंडाधिकारी न्यायालयात स्वतंत्र खाजगी तक्रार दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचंही लोकायुक्तांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.
अमोल मिटकरींचा धनंजय मुंडेंना घरचा आहेर; तुम्हाला चमकोगिरी वाटत असेल तर…
रोहित पवार यांच्यावर टीका; माझी वाचा गेली असती तर बरं झालं असतं : धनंजय मुंडे