नागपूर: अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अडचणीत सापडत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहकारी वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचे दिसून आले. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आता नागपूरच्या एका महिलेनं धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.
रंजना नागपूरकर असे आरोप करणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्यांनी धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी कैलास फड, निखील फड यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे आरोप केले आहेत. निलंबित केलेल्या पतीला सरकारी नोकरीत पुन्हा रुजू करतो, असे आश्वासन देऊन कैलास फड, निखील फड यांनी आपल्याकडून १७ लाख रुपये घेतले. हे पैसे धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. त्यांच्याच बंगल्यावर हे पैसे दिले, असा आरोप नागपूरकर यांनी केला.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
रंजना नागपूरकर यांनी आर्थिक फसवणुकीचा आरोप करताना म्हटले आहे की, पतीला सरकारी नोकरीत पुन्हा रुजू करून घेण्यासाठी मुंडे यांनी पैसे मागितले. त्यांनी २५ लाखांची मागणी केली होती. मात्र नंतर ही रक्कम कमी करून १७ लाख करण्यात आली. मी दोन तासांच्या अंतराने एकदा आठ तर एकदा नऊ लाख रुपये धनंजय मुंडे यांच्या घरी नेऊन दिले. ‘मी एकूण 17 लाख रुपये दिले. प्रथम परळीतील मुंडे यांच्या घरी गेल्या तेव्हा मुंडे यांनी सांगितलं, “जा, तुमचं काम आता पूर्ण झालं आहे.” पण नंतर ना पतीची नोकरी मिळाली, ना पैसे परत मिळाले’, असा आरोप त्यांनी केला आहे.
‘मी पुन्हा पैसे मागायला परळीतील घरात गेले. तेव्हा तिथे धनंजय मुंडे, कैलास फड, निखील फड यांच्यासोबत मुंडे यांच्या पत्नी आणि आईही उपस्थित होत्या. त्यावेळी मुंडे यांच्यासमोरच माझ्या मानेवर पिस्तूल लावून भीती घातल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. “तू पुन्हा आलीस तर तुला गाडून टाकू, कुणालाही कळणारही नाही”, अशी धमकी मला देण्यात आली. या धमकीनंतर रंजना यांनी त्यांच्या बंगल्यावर जाणं बंद केल्याचा आरोप रंजना नागपूरकर यांनी केला. दरम्यान, नागपूरकर यांच्या या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुप्रिया सुळे यांचा धनंजय मुंडे यांच्या कमबॅकला कडाडून विरोध; म्हणाल्या…
मनोज जरांगे नार्को टेस्टसाठी तयार, धनंजय मुंडे यांना खुलं आव्हान…
सनसनाटी गौप्यस्फोट! धनूभाऊ, तुमचा इंदोरमध्ये मर्डर झाला असता…
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप…