अजितदादांचा घातपात? रोहित पवार यांच्या प्रश्नांनंतर सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी…

ajit-pawar-plane-crash
Share

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातातील निधनाने महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. या घटनेवरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी एक ट्वीट करून आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंकांची तातडीने चौकशी करण्याची आणि त्यांना कडेकोट सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आदरणीय अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकूल आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने काही तथ्ये आणि शंका उपस्थित करत आहेत. या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत. यंत्रणेकडून उत्तरे मिळण्यास उशीर झाल्यास अस्वस्थता वाढेल. त्यामुळे या घटनेतील सत्य पारदर्शकपणे समोर येणे गरजेचे आहे. रोहित पवार जनतेच्या मनातील प्रश्न विचारत असल्याने त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे.”

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

रोहित पवार ज्या पद्धतीने या प्रकरणाचा तांत्रिक आणि सखोल अभ्यास करून पाठपुरावा करत आहेत, ते पाहता त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेतही रोहित पवार यांनी आपल्या कुटुंबीयांना आपल्या सुरक्षितेची काळजी वाटत असल्याचे म्हटले. “व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा घटनादत्त अधिकार आहे,” असे म्हणत सुळे यांनी राज्य सरकारला याप्रकरणी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय; रोक सके तो रोक लो…

अजितदादांचं विमान पायलटने मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला…

रोहित पवार यांचा पुन्हा गौप्यस्फोट; अजितदादांच्या विमानाचा पुन्हा स्फोट का झाला…

अजित दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट किती पाहा…

अजित पवार विमान अपघात! पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा CCTV समोर आणा…

अजित पवार यांचा घातपात की अपघात; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

अजित दादांच्या विमान अपघाताचे गूढ वाढतच चाललं; रोहित पवार यांचा नवा खुलासा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *