अजितदादांचं विमान पायलटने मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला…

ajit-pawar-plane-crash
Share

मुंबईः राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी बारामतीत दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी असतानाही वैमानिक कॅप्टन सुमित कपूर याने विमान माघारी न फिरवता खाली उतरवले. त्याने विमानाचा स्फोट करण्यासाठी विमान मुद्दाम खाली आदळले, असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक नव्या शंका उपस्थित केल्या. यावेळी त्यांनी विमानाचा पायलट सुमित कपूर आणि व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोपही केले.

मुंबईवरुन बारामतीला जाण्यासाठी फार इंधनाची गरज नव्हती. तरीही अजितदादांच्या विमानाच्या पंखातील इंधनाच्या टाक्या पूर्णपणे भरण्यात आल्या होत्या. हे विमान बारामतीवरुन हैदराबादला जाणार होते. तिथे विमानात पुन्हा इंधन भरता आले असते. मात्र, हे विमान सुरतवरुन मुंबईला येत असतानाच त्याच्या इंधन टाक्या पूर्णपणे भरल्या होत्या. या विमानात अपघाताच्या वेळी 3000 ते 3500 लीटर इंधन होते. एवढेच नव्हे तर विमानाच्या टॉयलेटजवळ इंधनाचे अतिरिक्त कॅनही ठेवले होते. या सगळ्यात पायलटचा वापर करुन अजित पवार यांच्या विमानाचा अपघात घडवण्यात आला, असे आम्हाला वाटते. विमानात जास्त इंधन असेल तर मोठा स्फोट होईल, हा आमचा संशय खरा ठरताना दिसत आहे. बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी दृश्यमानता कमी असूनही पायलट सुमित कपूर यांनी माघारी न फिरता एक गिरकी घेऊन विमान खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. किंबहुना त्यांनी विमान मुद्दाम खाली आदळले आणि स्फोट घडवून आणला, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

विमानाच्या लँडिगसाठी 5000 इतकी दृश्यमानता लागते. मात्र, बारामतीत त्यावेळी 3500 इतकीच दृश्यमानता होती. मुळात मुंबईतून उड्डाण करतानाच दृश्यमानता कमी होती. तरीही विमानाच्या उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली. यानंतरही विमानाने उड्डाण केले तरी ते बारामतीत लँड करायला नव्हते पाहिजे. त्यामुळे या अपघाताबाबत घातपाताचा संशय अधिक बळावतो, असे रोहित पवार यांनी म्हटले.

व्हीएसआर कंपनीचा गोपी नावाच हँडलर मुंबईत बसतो. तो फ्लाईट प्लॅनमध्ये फेरफार करु शकतो. माझ्या माहितीनुसार, सध्या तपास सुरु असून व्हीएसआर कंपनीकडून कागदपत्रे मिळण्यात विलंब होत आहे. कारण, व्हीएसआर कंपनीकडून सध्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिल्लीवरुन फ्लाईट प्लॅन आल्यानंतर हँडलर गोपीने त्यामध्ये बदल केले असावेत. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करताना त्यावेळी पाठवण्यात आलेले ई-मेल तपासावेत, असे रोहित पवार यांनी म्हटले.

रोहित पवार यांचा पुन्हा गौप्यस्फोट; अजितदादांच्या विमानाचा पुन्हा स्फोट का झाला…

अजित दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट किती पाहा…

अजित पवार विमान अपघात! पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा CCTV समोर आणा…

अजित पवार यांचा घातपात की अपघात; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

अजित दादांच्या विमान अपघाताचे गूढ वाढतच चाललं; रोहित पवार यांचा नवा खुलासा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *