नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंत्रिमंडळ बदलाच्या हालचालींची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. २१) दिल्लीत बैठक पार पडली. तीन दिवसांपूर्वी अमित शाह यांची पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी भेट घेतल्यानंतर त्यानंतर लगेचच राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत अमित शाहांकडे बैठक पार पडली. अमित शाह यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडणाऱ्या घडामोडींकडे विशेष लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये अमित शाह यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या वाट्याला सुरूवातीला आलेलं अर्थ खातं मिळण्यासोबतच मंत्रिपद बदलण्याची देखील राष्ट्रवादीच्या प्रमुखांकडून अमित शहांकडे इच्छा व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तीन दिवसांपूर्वी पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांची आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांसोबत पुन्हा बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे, अमित शहा यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडणाऱ्या घडामोडींकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
View this post on Instagram
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत बदलाचे वारे वाहू लागले आहे, आता राष्ट्रवादी पक्षात कोणते बदल होणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे, मात्र पक्षामध्ये अंतर्गत बदल होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे, गेल्या काही दिवसांमध्ये पार्थ पवार यांनी पक्षाची कमान हाती घेतली आहे, त्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय ते घेत आहेत, त्यामध्ये हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतात अशी माहिती आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
One thought on “चर्चांना उधाण! राष्ट्रवादीत मंत्रिमंडळ बदलाच्या जोरदार हालचाली सुरू…”