चर्चांना उधाण! ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदे याचा भाजपमध्ये पक्षप्रवेश…

mayur-shinde-thane
Share

ठाणे: मुंबई-ठाणे परिसरातील विविध गुन्ह्यांमध्ये नाव असलेला कुख्यात गुंड मयूर शिंदे याने अखेर मंगळवारी (ता. २३) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मयूर शिंदे हा भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे.

ठाण्यातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी संध्याकाळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गुंड मयूर शिंदे याच्या हाती कमळ देऊन त्याला पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या विरोधामुळे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, अचानक झालेल्या या पक्षप्रवेशामुळे भाजपमधील वरिष्ठांचा विरोध शिथिल झाला आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

मयूर शिंदे याच्यावर हत्या, खंडणी, पोलिसावर हल्ल्याचा प्रयत्न तसेच हत्येचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. २०११ साली त्याच्याविरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तसेच २०२३ मध्ये खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमकीप्रकरणीही शिंदे याला अटक करण्यात आली होती. मयूर शिंदे हा मुंबई आणि ठाण्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला आरोपी आहे. मयूर हा पूर्वी भांडूपमध्ये राहत होता. पोलिसांनी तडीपार केल्यानंतर तो ठाण्यात राहायला आला.

२०१७ मध्ये ठाण्यातील सावरकरनगर भागातून शिंदेने शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी त्याला उमेदवारी मिळाली नव्हती. यंदा पुन्हा निवडणूक लढविण्याची तयारी करत त्याने भाजपमध्ये प्रवेशासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, आचारसंहितेचे कारण पुढे करत हा कार्यक्रम रद्द झाल्याचे स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी थेट भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयात जाऊन मयूर शिंदेने आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि संदीप लेले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडीमुळे भाजपमध्येच नव्हे तर राज्याच्या राजकारणातही नव्या चर्चांना उधाण आले आहे.

भाजप आमदाराचा मुजोरपणा; वृद्ध रिक्षाचालकाला केली मारहाण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *