कॅलिफोर्नियाः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आता केवळ ईमेल लिहिण्यापुरती किंवा फोटो तयार करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. जसजशी तिची प्रगती होत आहे, तसतसे तिचे धोकेही वाढत आहेत. सायबर गुन्हेगार आता पूर्वीपेक्षा अधिक वेगाने आणि धोकादायक सायबर हल्ले करण्यासाठी एआयचा वापर करत आहेत. चीनशी संबंधित एका हॅकिंग गटाने जगभरातील शेकडो कंपन्यांमध्ये घुसखोरी करण्यासाठी एआयवर चालणाऱ्या साधनांचा वापर केला आहे, असा इशारा मायक्रोसॉफ्टने दिला आहे.
मायक्रोसॉफ्टने स्टॉर्म-०९४० नावाच्या एका हॅकर गटाचा शोध लावला आहे. या गटाने कंपन्या आणि व्यक्तींवरील सायबर हल्ले स्वयंचलित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साधनांचा वापर केला. या साधनांमुळे हॅकर्सना तीन तासांपेक्षा कमी वेळात कंपन्यांच्या क्लाउड नेटवर्कवर नियंत्रण मिळवता आले.
कंपन्यांवर थेट हल्ला करण्याऐवजी, हॅकर्सनी सप्लाय चेन अटॅक म्हणून ओळखला जाणारा अधिक कपटी मार्ग निवडला. त्यांनी सर्वप्रथम कनेक्टवाइज नावाच्या एका आयटी कंपनीला लक्ष्य केले, विशेषतः तिच्या क्लाउड बॅकअप सेवेला.
नुकसान पसरण्यापासून रोखण्यासाठी, कनेक्टवाइजने प्रभावित ॲप्सचे कनेक्शन तत्काळ थांबवले असून, आता हळूहळू आपल्या सेवा पुन्हा सुरू करत आहे. मात्र, रिव्हेलो यांनी इशारा दिला, की केवळ कनेक्शन ब्लॉक केल्याने हॅकर्सना दूर ठेवता येणार नाही. जर हॅकर्स ग्राहकाच्या सिस्टीममध्ये आधीच शिरले असतील, तर ते आतच राहतील. त्यामुळे, हॅकर्स अजूनही उपस्थित आहेत की नाही, हे तपासण्यासाठी सर्व ग्राहकांना स्वतंत्रपणे स्वतःची सिस्टीम स्कॅन करणे आवश्यक आहे.
हे करण्यासाठी, हॅकर्सनी आर्टेक्स नावाचे ओपन-सोर्स सॉफ्टवेअर वापरले. मायक्रोसॉफ्टच्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, स्टॉर्म-०९४० हॅकर गटाने आर्टेक्स एआयचा वापर करून दोन कामे स्वयंचलित केली. पहिले, पासवर्ड स्प्रेइंग, म्हणजेच सिस्टममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एकाच वेळी अनेक खात्यांवर सामान्य पासवर्ड वापरून पाहणे, आणि दुसरे, एकदा सिस्टममध्ये प्रवेश मिळाल्यावर, डेटा मिळवण्यासाठी ॲप्समधील वापरकर्ता परवानग्यांचा गैरवापर करणे.
ते एआय टूल दर मिनिटाला २,९०० साइन-इनचे प्रयत्न करत होते आणि २,२५० पेक्षा जास्त वेगवेगळ्या कंपन्यांच्या सिस्टीममध्ये प्रवेश मिळवत होते. एकदा प्रवेश मिळाल्यावर, त्या एआयने आपोआप नेटवर्क स्कॅन केले. पासवर्ड बदलून कायमस्वरूपी बॅकडोअर्स तयार केले आणि स्वतःला सर्वोच्च प्रशासकाचे अधिकार दिले. मायक्रोसॉफ्टने सांगितले की, ते एआय इतक्या वेगाने काम करत होते की मानवी सुरक्षा पथके त्याचा वेग राखू शकत नव्हती, ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना हा हल्ला शोधून त्यावर प्रतिसाद देण्यासाठी फारच कमी वेळ मिळत होता.