विमान अपघातावेळी ‘धुकं नव्हतं तर…, अजितदादांचा 100 टक्के घात झालाय…

ajit-pawar-plane-crash
Share

मुंबईः राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शंका उपस्थित केली आहे. विमान अपघातावेळी ‘तिथं धुकं नव्हतं तर धोका होता’, त्यामुळे अजित दादांचा 100 टक्के घात झाल्याचे ते म्हणाले. जोपर्यंत जिवंत आहोत, तोपर्यंत लढा देणार, आणि सर्व सत्य जनतेसमोर आणण्यासाठी प्रयत्न करणार, असेही मिटकरी म्हणाले.

मिटकरी म्हणाले, आज माझं कधीही न भरून निघणारं नुकसान झाले आहे. लवकरच अजितदादानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या निष्ठेपायी त्यांना समर्पित करण्याचा निर्णय घेणार आहे. यासंदर्भात ‘मे’ महिन्यात भूमिका जाहीर करणार आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली, त्यांचा शपथविधी पार पडला, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची बैठकही झाली आहे, अजित पवार यांच्या निधनानंतर पाचव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एक भावनिक पोस्ट लिहून पाच प्रश्नांनी लक्ष देखील वेधले आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

अमोल मिटकरी यांची पोस्ट पुढीलप्रमाणे…
अमोल मिटकरी यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती पोस्ट लिहली आहे, त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, “आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले 😢
त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची.
आणि दुसरी – आदरणीय दादांची!!”.

“मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही.
मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय—

• अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?
• सहावी व्यक्ती कुठे गेली?
• Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?
• एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???
• एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?
प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

अजित पवरांच्या निधनानंतर रोहित पवारांची भावनिक पोस्ट चर्चेत;  म्हणाले…

‘कामाचा माणूस’ अजित पवार अनंतात विलीन; जमावाला अश्रू अनावर…

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात अन् पायलटच्या मित्राची धक्कादायक माहिती…

महाराष्ट्रावर शोककळा! अजित पवार यांचे विमान अपघातात निधन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *