पुणे : नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या विकृतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नव्या घडामोडीमुळे खरातच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका अल्पवयीन मुलीवर तथाकथित ‘उपचार’ करत असल्याचा व्हिडीओ समोर आला असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धा आणि फसवणुकीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
व्हायरल व्हिडिओमध्ये खरात एका अल्पवयीन मुलीला टी-शर्ट वर करायला सांगताना दिसतो. त्यानंतर तो ‘इंटरनेट केबल टूल’ आणि ‘केबल टेस्टर’सारख्या उपकरणांचा वापर मुलीच्या पोटावर करताना दिसतो. विशेष म्हणजे, हा प्रकार मुलीच्या आईसमोरच केबिनमध्ये घडत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसते. उपचाराच्या नावाखाली अघोरी क्रिया केल्याचा बनाव रचत हा प्रकार केल्याचे उघड झाले असून, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दरम्यान, अशोक खरात याच्यावर बलात्कार, लैंगिक छळ आणि अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. आता हा नवा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्यावर ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायदा’ (अंधश्रद्धा निर्मूलन कायदा) अंतर्गत आणखी गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपआयुक्त तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (SIT) करत आहे. खरातच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी सुरू असून, त्यातून अशाच प्रकारचे आणखी धक्कादायक प्रकार समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…
नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…
रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…
अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…
धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…
खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…
रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…
मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…
रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…
मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…
नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…