खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…

Capton-Nashik
Share

मुंबईः नाशिकचा तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर झालेल्या कथित जादूटोण्याचा संबंध अशोक खरात याच्याशी जोडला जात आहे. अजितदादांच्या घरासमोर कथाकथित जादूटोणा केला गेला होता. त्यामागे नाशिक प्रकरणातील आरोपी अशोक खरात आहे, अशी शंका यावेळी व्यक्त केली जात आहे.

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

अजित दादा कधी कुठल्या अंगठ्या आणि अशा बाबांवर विश्वास ठेवत नव्हते पण त्यांच्याच पक्षातील लोकं अजित पवार यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करत होते, असे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुनील माने यांनी यांनी म्हटले आहे. अजित दादांच्या घराबाहेर जादूटोणा आणि काळी जादू त्यांच्याच लोकांनी केली असल्याचा खळबळजनक दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुनील माने यांनी केला आहे.

महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा केला आहे. एसआयटीने यावर देखील कारवाई केली पाहिजे. अजितदादांच्या जवळच्या नेत्यांनी असा प्रकार केला होता. अजितदादांच्या घरासमोर कथाकथित जादूटोणा केला होता, काही वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. त्यात नाशिक प्रकरणातील आरोपी अशोक खरात याचा सुद्धा यात सहभाग असल्याचं माने यांनी म्हणलं आहे. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा आणला आहे. त्यामुळे नाशिक प्रकरणात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

दरम्यान, रुपाली चाकणकरांनी यावर महिलांची बाजू मांडली पाहिजे, त्यांनी सर्वप्रथम राजीनामा दिला पाहिजे. कॅप्टन खरातचं भिंग फुटलंय. आता त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय. अशोक खरात संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या SIT च्या प्रमुखपदी महिला IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…

मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…

रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…

मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…

नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…

अजितदादा विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; माझ्याकडे मोठी माहिती…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *