मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…

Capton-Nashik
Share

मुंबई : नाशिकचा भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात कारवाई करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यापूर्वीच लक्ष घातले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरच राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, ‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच या प्रकरणात लक्ष घातले होते आणि पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस महासंचालकांशी थेट संपर्क साधत आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश दिल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात महत्त्वाचे व्हिडीओ क्लिप्स आणि इतर गंभीर पुरावे आधीच पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर अशोक खरातविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.’

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका महिलेनं खरात याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रँचने खरातच्या घरावर छापा टाकत कारवाई केली. अटकेची कुणकुण लागताच अशोक खरात पळून जाऊ शकतो, या शक्यतेमुळे पोलिसांनी योजनाबद्ध सापळा रचला होता. पोलिसांनी खरात राहत असल्याच्या परिसरात चोर शिरल्याचे कारण देत कारवाई सुरू केली, ज्यामुळे कुणालाही संशय आला नाही. त्यानंतर एक पथक अशोक खरातच्या घरात शिरलं, तर दुसरं पथक घराबाहेर तैनात होते. खरात घरात असल्याची खात्री होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकसह राज्यभरात खळबळ उडाली असून, भोंदूगिरीच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातचे विकृत कारनामे समोर येत आहेत. मात्र, या भोंदूबाबाची पाद्यपूजा केल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…

मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…

नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…

अजितदादा विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; माझ्याकडे मोठी माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *