नाशिक: तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
नाशिक पोलिसांनी कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. या पेन ड्राइव्हमध्ये तब्बल 58 व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर येत आहे. तर या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी या प्रकरणात खळबळजनक आरोप केले आहेत.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
रूपाली ठोंबरे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाल्या, ‘हा विषय कोणत्या पक्षाचा, जातीचा नाही तर हा विषय महिलांचा आहे. एक वर्षापूर्वी या प्रकरणाची वाचा फोडली होती. ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली निलेश चाकणकर आहेत. त्यामुळे पोलिस कारवाई करत नव्हते का? 58 व्हिडिओ आहेत. म्हणजे 58 महिलांवर अत्याचार झाला आहे का? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पदापदावरून पायउतार झाले पाहिजे. त्याशिवाय या प्रकरणाचा तपास पूर्ण होणार नाही. चाकणकर मॅडम त्या पदावर राहिल्या तर पुरावा नष्ट करणार.’
सर्व ट्रस्टवर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. जर रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला नाही तर संपूर्ण राज्यभर आंदोलन करणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या कानावर हा विषय टाकणार आहे. संविधानिक पदावर असल्यामुळे, तपास योग्य होणार नाही, त्यांनी रुपाली चाकणकर यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, असे देखील रूपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे.
मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…
नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…