मोठी बातमी! पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढणार…

Devendra-Fadnavis
Share

मुंबई : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात सर्वच ठिकाणी एकनाथ शिंदेंची शिवसेना ही भाजपसोबत असेल. तर पुण्यामध्ये, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभे ठाकेल, पण ही मैत्रीपूर्ण लढत असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी त्याचा निकाल जाहीर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम, तसेच महायुती सरकारने केलेले काम पाहता आम्हाला संधी मिळेल. राज्यात बहुतांश ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मात्र भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय प्रचारासाठी बनवा स्वतःचे पुस्तक…

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्र लढू शकणार नाहीत. त्यावर अजितदादांशी चर्चा झाली आहे. आम्ही जर एकत्र लढलो तर त्याचा फायदा हा विरोधकांना होणार हे इतकं राजकारण आम्हाला दोघांनाही समजतं. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार असून ती मैत्रीपूर्ण लढत असेल. नगरपालिका निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढलेले शिवसेना आणि भाजप हे महापालिका निवडणुकीत मात्र एकत्रित दिसणार आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमच्यासोबत असेल.’

मतदारयादीतील घोळावरुन विरोधक सातत्याने निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतात. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, थोड्या काही प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोळ असतो, ते आम्हीही दाखवलं आहे. पण त्यामुळे निवडणूकच घ्यायच्या नाहीत हे मत चुकीचं आहे. येत्या काळात एसआयआर प्रक्रियामुळे मतदार याद्यातील घोळ कमी होईल. पण निवडणूक आयोगाने पुढील काळात या याद्या ब्लॉक चेन मध्ये टाकाव्यात, म्हणजे सगळाच घोळ संपून जाईल.

महापालिकेच्या निवडणुकीच्या तारखा पुढीलप्रमाणे…
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे – 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
अर्जाची छाननी – 31 डिसेंबर
उमेदवारी माघारीची मुदत – 2 जानेवारी
चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी – 3 जानेवारी
मतदान – 15 जानेवारी
निकाल – 16 जानेवारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *