पुणे : इराणविरोधात अमेरिका, इस्रायलने यांनी सुरू केलेल्या हल्ल्याचे पडसाद थेट भारतीयांच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या दुसऱ्या सिलिंडरसाठी १५ दिवसांचा कालावधी बदलून २५ दिवसांचा करण्यात आला आहे, तसेच केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडर महिनाभरातून एकच देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
नागरिकांना घरात दोन एलपीजी सिलिंडर वापरण्याची परवानगी असते. त्यासाठी पहिला सिलिंडर अर्ज घेतल्यानंतर १५ दिवसांनी अर्ज करता येत होता. आता अचानक कालावधी वाढवण्यात आला आहे. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडर महिनाभरातून एकच देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व गॅस वितरक केंद्रांना लेखी आदेश देण्यात आले आहेत.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
तेल कंपन्यांनी घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या प्रति सिलिंडरच्या (वजन १४.२ किलो) किंमतीत शनिवारी ६० रुपयांची वाढ केली. ही दरवाढ तत्काळ लागू करण्यात आली. गेल्या ११ महिन्यांत झालेली ही दुसरी दरवाढ आहे. लाभार्थी उज्ज्वला योजनेचे असलेल्या व २०१६ पासून मोफत एलपीजी कनेक्शन मिळालेल्या १० कोटींहून अधिक गरीब कुटुंबांनादेखील ही दरवाढ सहन करावी लागेल. हॉटेल, रेस्टॉरंट आदी ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक एलपीजी गॅसच्या १९ किलोच्या सिलिंडरची किंमत ११४.५ रुपयांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकारच्या सिलिंडरची किंमत १८८३ रुपये झाली आहे. १ मार्च रोजीच १९ किलो सिलिंडरच्या किमतीत २८ रुपयांची वाढ करण्यात आली होती.
अमेरिका, इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे जागतिक पातळीवर परिणाम होत असून त्याचा फटका भारतालाही बसत आहे. सध्या देशात एलपीजी गॅसची तुटवड्याची परिस्थिती जाणवत आहे. याचा सर्वात मोठा परिणाम हॉटेल उद्योगावर झाला आहे. कमर्शियल एलपीजी गॅसचे दर अचानक 150 ते 200 रुपयांनी वाढले आहेत. यामुळे हॉटेल व्यवसाय पुढे कसा चालवायचा, हा प्रश्न व्यवसायिकांसमोर उभा राहिला आहे
युद्धजन्य परिस्थितीमुळे पुण्यात कमर्शियल एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम आता पुण्यातील अंत्यसंस्कार व्यवस्थेवरही होताना दिसत आहे. पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या सध्या बंद ठेवाव्या लागल्या आहेत. येथे एकूण पाच गॅस दाहिन्या असून, गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून त्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. गॅस उपलब्ध नसल्यामुळे सध्या अंत्यसंस्कार विद्युत दाहिनी किंवा पारंपरिक पद्धतीने लाकडांवरच करण्यात येत आहेत.