नवी दिल्ली: महाराष्ट्रात पहिल्यांदाच नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये अभुतपूर्व गोंधळ दिसून आला आहे. ऐन मतदानाच्या दिवशी नागपूर खंडपीठाने नगरपरिषदेची मतमोजणीही २१ डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय दिला. नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर आली आहे.
महाराष्ट्रातील नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नागपूर खंडपीठाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात २ डिसेंबरला पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल आणि २० डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीचा निकाल एकत्रित २१ डिसेंबराला देण्याचा निर्णय दिला होता.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने नागपूर खंडपीठाचा आदेश कायम ठेवला. नगर परिषद, नगर पालिका निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय देताना कोणत्याही प्रकारची निवडणूक पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. 31 जानेवारी पूर्वी दिलेल्या मुदतीमध्येच निवडणुका पूर्ण व्हाव्यात असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे राज्यातील सुरू असलेल्या नगरपालिका, नगरपरिषद निवडणूक यांचा निकाल आता 21 डिसेंबर रोजीच होणार आहे. राज्यात नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर विरोधात काही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने भूमिका स्पष्ट करत दिलेल्या मुदतीमध्ये निवडणुका पूर्ण कराव्यात असे आदेश दिले आहेत.