निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल; धाड प्रकरण अंगलट…

nilesh-rane
Share

सिंधुदुर्ग : भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरात घुसून धाड टाकल्या प्रकरणी निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या कॅमेरा मनवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. निलेश राणे यांनी धाड टाकून भाजपकडून निवडणुकीत पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

मालवणध्ये पैसे वाटपावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये घमासान सुरु आहे. भाजप पदाधिका-यांच्या घरी पैसे सापडल्याच्या मुद्द्यावरुन राणे बंधू आमनेसामने आलेत. निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्ता विजय केनवडेकर यांच्या घरावर धडा टाकली आणि नोटांचे बंडड सापडल्याचा दावा केला होता. विजय केनवडेकरांच्या घरी निलेश राणे यांनी स्टिँग ऑपरेशन केले, तिथेच मंत्री नितेश राणे पोहोचले. यावेळी नितेश राणे यांनी केनवडेकरांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. या भेटीनंतर नितेश राणे यांनी निलेश राणे यांचे आरोप फेटाळले. आम्ही फक्त विकासावर बोलणार असून निवडणूक भरकटू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

दरम्यान, निलेश राणे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. वकिलांनी त्यांचे काम केले आहे. आता पोलिसांनी मला अटक करुन दाखवावी असे निलेश राणे म्हणाले. शिवाय, निलेश राणे यांच्या या आरोपांनंतर आता दोन्ही भावांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

कट्टर विरोधक नितेश राणे यांची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट; म्हणाले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *