अकोला : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अकोट नगरपरिषदेच्या महिला उमेदवाराचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. अलमास परवीनशेख सलीम असे या महिला उमेदवाराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 4 (ब) मधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमदेवार अलमास परवीनशेख सलीम यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
अकोट नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 4 (ब) मधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अलमास परवीनशेख सलीम यांना उमेदवारी दिली होती.त्यामुळे त्या प्रचारात व्यग्र होत्या. अलमास परवीनशेख सलीम या खाजगी कामानिमित्त आज आपल्या पतींसोबत दुचाकीने जात होते. या दरम्यान त्यांच्या वाहनाला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत अलमास परवीन शेख सलीम यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने त्यांचे पती या अपघातात बचावले आहेत. पण त्यांना या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने अकोट शहरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या अपघातानंतर अज्ञात वाहनचालक फरार झाला असून पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.