युगेंद्र पवार लग्नबंधनात अडकणार अन् सख्खे काका अजित पवार…

yugendra-pawar
Share

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक कार्यक्रमांच्या वेळी पवार कुटुंबीय एकत्र आल्याचे दिसून आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचा आज (शनिवार) विवाह सोहळा पार पडणार आहे. युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी आज लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र, या विवाह सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता वाढली आहे. कारण आज विवाहाच्या दिवशी अजित पवार यांचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसभर प्रचार दौरे आधीपासून ठरलेले आहेत.

अजित पवार यांच्या आज भोर, दौंड, इंदापूर, माळेगाव आणि बारामती या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत. बारामतीतील सभा सायंकाळी साडेसहाला होणार आहे, तर युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा सायंकाळी 5.15 वाजता होणार आहे. विवाह सोहळ्याच्या पूर्वसंध्येला जय पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावली आहे. तसेच हळदी समारंभाचे काही फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले असून, त्या युगेंद्र पवारांना हळद लावताना दिसत आहेत. दुसरीकडे आमदार रोहित पवार आज दिवसभर जामखेडमध्ये प्रचार दौरा करणार असल्याने तेही विवाहाला उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र, त्यांनी हळदी समारंभाला मात्र हजेरी लावली होती.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

दरम्यान, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अजित पवार हे या निवडणुकीत प्रचार करत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुतण्या युगेंद्र पवार यांच्या लग्नाच्या वेळी उपस्थित नसतील, अशी माहिती मिळत आहे. मात्र, रात्री उशिरा ते विवाहस्थळी येऊ शकतील, अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. आता अजित पवार युगेंद्र पवार यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *