अकोला: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मशिदीबाहेर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी काही राजकीय वर्तुळातील नेत्यांची नावे समोर आली आहेत, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचे नाव आले आहे.
अकोट तालुक्यातल्या त्यांच्या मोहाळा गावात हल्लेखोराने त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला होता. राजकीय आणि कौटूंबिक वादातून उबेद पटेल याने हिदायत पटेल यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली होती. त्यांनतर मारेकरी फरार असून संशयित आरोपी उबेद पटेल याला रात्री पणज गावातील लोकांनी पकडून दिले आहे. हिदायत पटेल हल्ला प्रकरणातील आरोपींमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे आणि काँग्रेस नेते अन् जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे यांच्या नावाचा समावेश आहे. अकोट ग्रामीण पोलिसांत 5 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल हल्ला प्रकरणात पाच आरोपींवर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री पाच आरोपींवर खुनाचा प्रयत्न करीत कट रचल्याचा आरोप असल्याने गुन्हे दाखल करण्यात आला होता. पटेल कुटुंबियांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत. हल्लेखोर आरोपी उबेद पटेल आणि आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अकोट ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे .
दरम्यान, हिदायत पटेल हे काल (मंगळवारी) दुपारच्या दोन वाजताच्या नमाजनंतर मोहाळा गावातील मशिदीत नमाज पाडून बाहेर येत असताना उबेदने हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला केला आहे. पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर वार केले. यानंतर गंभीर जखमी असलेल्या हिदायत पटेल यांना अकोटमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, हल्ल्यात जबर मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. अखेर उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
कोण होते हिदायत पटेल…
– सध्या प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष. अकोल्यातील काँग्रेसचा मोठा मुस्लिम चेहरा
– पटेल 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार.
– पटेल 2014 मध्ये दुसर्या स्थानावर. तर 2019 मध्ये तिसर्या स्थानावर.
– हिदायत पटेल जिल्ह्यातील मोठे सहकार नेते. 25 वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक.
– सध्या अकोट तालूका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष.
– 35 वर्षांपासून जिल्ह्यातील महत्वाच्या अकोट बाजार समितीचे माजी सभापती आणि सध्या संचालक.