ठाणे: राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी ठाण्यासह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. यानंतर काल ठाण्यात मोक्काचा आरोपी आणि गंभीर गुन्ह्यांप्रकरणी तडीपारीची कारवाई झालेला गुंड मयूर शिंदे याचा भाजपमध्ये प्रवेश होणार होता. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह बड्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मयूर शिंदे याच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र, शेवटच्या क्षणी हा पक्षप्रवेश थांबवण्यात आला आहे.
मयूर शिंदे याने भाजप प्रवेशापूर्वी ठाण्यात बॅनर्स लावून जोरदार जाहिरातबाजी केली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटले होते. यावरुन टीका होत असल्याचे लक्षात आल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांनी कालच्या पक्षप्रवेश सोहळ्याकडे पाठ फिरवली. परिणामी मयूर शिंदे याचे भाजप प्रवेश राहिला.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
कोण आहे मयूर शिंदे…
मयूर शिंदे हा मुंबई आणि ठाण्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला आरोपी आहे. तो पूर्वी भांडूपमध्ये राहत होता. पोलिसांनी तडीपार केल्यानंतर तो ठाण्यात राहायला आला. त्यांच्यावर हत्या, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सध्या ठाण्यातील सावरकर नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 14 मधून लढण्याची तयारी करत आहे. भाजपमधून तिकीट मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी तो गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या व्यासपीठावर दिसत होता. मयूर शिंदे याने सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे बॅनर्स शहरभर लावले होते. सावरकर नगरमधील आर.जे. ठाकूर महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मयूर शिंदे याने जोरदार तयारी केली होती. 2023 साली मयूर शिंदे हा खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आला होता. याप्रकरणी त्याला अटकही झाली होती.