राष्ट्रवादीतील नाराजीनाट्याच्या पार्श्वभूमीवर गुप्तभेट; कोणाला सुगावाही नाही…

sharad-pawar
Share

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात सध्या सुरु असलेल्या नाराजीनाट्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या दोघांना पक्षातून साईडलाईन करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल पटेल यांना डच्चू देण्यात आल्याची चर्चा होती. तर सुनील तटकरे यांचाही प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख टाळण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. यानंतर सुनील तटकरे यांनी अचानक 12 मे रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. मात्र, त्याचदिवशी प्रफुल पटेल हेदेखील शरद पवार यांना भेटून गेले होते, अशी नवीन माहिती समोर येत आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

सुनील तटकरे हे 12 मे रोजी रात्री शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेटीसाठी गेले होते. तटकरे यांच्या या भेटीआधीच प्रफुल पटेल हेदेखील शरद पवार यांना भेटण्यासाठी आले होते, अशी माहिती पुढे आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या संपूर्ण नाराजीनाट्याबाबत प्रफुल पटेल हे आतापर्यंत मौन बाळगून होते. मात्र, त्यांनीही 12 मे रोजी शरद पवार यांची भेट घेतल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काहीतरी वेगळ्याच हालचाली सुरु आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

12 मे रोजी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघेही आसाममधील एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी गुवाहाटी येथे गेले होते. यावेळी सुनेत्रा पवार यादेखील गुवाहाटीत होत्या. मात्र, परत येताना सुनेत्रा पवार यांनी आपल्याच पक्षाच्या सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमानातून येणे पसंत केले होते. त्यामुळे 12 मे च्या रात्री सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या दोघांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे उघड झाले आहे. प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची वेळ घेतली होती. ऐनवेळी सुनील तटकरे भेटीसाठी पोहचल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत तिन्ही नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात सावळागोंधळ…

चर्चांना उधाण! बारामतीचा पुढचा वारसदार कोण? तिसऱ्या पिढीचे दौरे अन्…

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा दिला राजीनामा; नियम काय सांगतो पाहा…

बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवार यांची मनाला भिडणारी पोस्ट…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *