पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अनेकांशी जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांच्या साधेपणामुळे, कामातील वेगामुळे आणि लोकांप्रती असलेल्या बांधिलकीमुळे ते सर्वसामान्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले. विकासकामांबाबत नेहमी जागरूक असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. सामान्य नागरिकाचे एखादे काम असो किंवा मोठा प्रशासकीय प्रश्न ‘काम झाले पाहिजे’ या भूमिकेतून ते निर्णय घेत असत.
आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी, कार्य आणि त्यांनी दिलेली प्रेरणा अनेकांच्या मनात जिवंत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विकासाच्या वाटचालीत त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. या पार्श्वभूमीवर पुणे येथील ईश्वरी प्रकाशन यांच्या वतीने अजित पवार यांच्या आठवणींवर आधारित एक विशेष स्मरणग्रंथ प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या ग्रंथामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, वैयक्तिक आठवणी, अनुभव, तसेच कामकाजातील प्रेरणादायी प्रसंग मांडले जाणार आहेत.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
या उपक्रमांतर्गत, अजित पवार यांच्यासोबतचे अनुभव, त्यांच्या कामकाजाबाबतच्या आठवणी, मार्गदर्शनाचे प्रसंग किंवा प्रेरणादायी घटना आपल्या शब्दांत लिहून पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त लेखांचे संपादकीय विभागाकडून आवश्यक संपादन करून निवडक लेख स्मरणग्रंथामध्ये समाविष्ट केले जाणार आहेत.
स्मरणग्रंथ लवकरच प्रकाशित करण्याचा मानस असून, हा ग्रंथ ऐतिहासिक दस्तऐवज ठरेल, असा विश्वास आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या आपल्या आठवणी लेखी स्वरूपात पाठवाव्यात, तसेच छायाचित्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा ठसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुस्तकामध्ये पहिल्या वीस जणांचे लेख घेतले जाणार असून, प्रत्येकाला पुस्तकातील दहा पाने दिली जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :
ईश्वरी प्रकाशन, पुणे
WhatsApp : 93712 69949
ई-मेल : ishwariprakashan@gmail.com