पुणे! गुंड बंडू आंदेकर याने जेलमधून बाहेर येऊन भरला अर्ज अन् हात उंचावत म्हणाला…

bandu-aandekar
Share

पुणे: तोंडावर काळं कापड बांधलेल्या आणि पोलिसांच्या दोरखंडात जखडलेल्या गुंड बंडू आंदेकर याने महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरला. यावेळी त्याने हात उंचावत व्हिक्ट्री साईनही दाखवली. ‘नेकी का काम, आंदेकर का नाम’ असे म्हणत बंडू आंदेकरने थेट अर्ज भरला आहे.

आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरने पोलिस बंदोबस्तात त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात त्याने अर्ज दाखल केला. आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या तुरुंगात आहे. बंडू आंदेकरने पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मधून अपक्ष अर्ज भरल्याची माहिती आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

बंडू आंदेकरला पोलिसांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आणले. त्यावेळी बंडू आंदेकर याने घोषणाबाजी केली. ‘नेकी का काम, आंदेकर का नाम’ अशी घोषणा आंदेकरने दिली. ‘बघा बघा, मला लोकशाहीत कसं आणलंय. आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत. मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही. वनराज आंदेकर जिंदाबाद..’ असे बंडू आंदेकर म्हणाला.

बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसेच सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती. मात्र, बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण, घोषणाबाजी करायला कोर्टाने मनाई केली. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हेदेखील 5 कोटी 40 लाखांच्या खंडणी प्रकरणात जेलमध्ये आहेत. आता यांना प्रचार करताना मात्र नियम पाळावे लागणार आहेत.

न्यायालयाच्या आदेशानंतर आंदेकर कुटुंबाने पोलिस संरक्षणात फॉर्म भरला असून निवडणूक आंदेकर कुटुंब जेलमधून लढवणार आहे. आंदेकर कुटुंबाने जरी फॉर्म भरला असला तरी ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप समोर आलेले नाही. येत्या काळात आंदेकर कुटुंबाचा निवडणूक प्रचार कसा होणार आणि मतदारांचा प्रतिसाद काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आंदेकर कुटुंबातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा आयुष कोमकर हत्याकांडाशी थेट संबंध नसल्याचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी म्हटले आहे. त्यामुळे या दोघींनाही राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. त्याचवेळी बंडू आंदेकरला राष्ट्रवादी उमेदवारी देणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 22, 23 आणि 24 मधून आंदेकर कुटुंबातील हे तिघेही निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *