बारामती : अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणाचा तपास व्हावा आणि संबंधित कंपन्या आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. अजित पवार यांचे दुसरे पुतणे युगेंद्र पवार हे देखील आता रोहित पवार यांच्या प्रमाणेच आक्रमक झाले आहेत. व्ही एस आर विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी बारामती पोलिस ठाण्यामध्ये रोहित पवार यांच्यासोबत ते जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
युगेंद्र पवार म्हणाले, ‘अजितदादांच्या विमान अपघातानंतर प्रथम मीच तिथे पोहोचलो, बारामती विमानतळावर गेल्यावर मला मला काहीच दिसलं नाही, माझी गाडी मी रनवेवर घेतली आणि 11 नंबर रनवे जिथे हे झालं, तिथं माझी गाडी घेऊन तिथे गेलो. खाली 50 फूट अंतरावर आपल्या दादांचा विमान मला खाली पडलेले दिसले. तिथे सगळा अपघात बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं विमान जळून खाक झालेलं, रोहित पवार हे काल मरीन लाईनला होते तिथे पोलिस स्टेशनला ते गेले होते, तिथे त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. तिथे बहुतेक त्यांनी गुन्हा घेतला नाही. रोहित पवार आज बारामतीत येत आहेत. बारामती पोलिस स्टेशन मध्ये ते जाणार आहेत. मी पण त्यांच्यासोबत तिथे जाणार आहे. व्ही आर एस कंपनी आणि कंपनीच्या विरोधात आम्ही या एफआयआर दाखल करणार आहे.’

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भीषण विमान अपघात मृत्यू झाल्याप्रकरणी सीआयडीला गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्याचे आदेश राज्य सरकारला द्या. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. २८ जानेवारी रोजी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि या अपघातात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
अजित पवार गाडीने प्रवास करून बारामतीला जाणार असताना ऐनवेळी एक खासदाराने त्यांना फोन करून व्हिएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास करण्यास भाग पाडले. मूळ ज्या कॅप्टनला ड्यूटी लावण्यात आली होती, ते दोघेही ट्रॅफिकमध्ये अडकले होते. त्यांचा जबाब नोंदविण्यात आलेला नाही, असे याचिकेत म्हटले आहे. तसेच व्हिएसआरला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आपल्या देशात व्हिएसआरची कोणतीही नोंदणी नसताना या कंपनीचे विमान चालविण्यात येते, असा दावा याचिकेद्वारे करण्यात आला आहे.
रोहित पवार सभागृहात ढसाढसा रडले, म्हणाले, तोपर्यंत शर्टचं बटण…
अजित काकांसाठी आम्ही लढत राहू, मराठी माणूस दाखवून देऊ: रोहित पवार
अजितदादांच्या घातपाताचा संशय, बारामतीमधील आणखी एक गाव बंद…
अजितदादा विमान अपघात प्रकरण! रोहित पवार यांचा दिल्लीत नवा गौप्यस्फोट…
अजितदादांचा घातपात? रोहित पवार यांच्या प्रश्नांनंतर सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी…
काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय; रोक सके तो रोक लो…
अजितदादांचं विमान पायलटने मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला…
रोहित पवार यांचा पुन्हा गौप्यस्फोट; अजितदादांच्या विमानाचा पुन्हा स्फोट का झाला…
अजित दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट किती पाहा…
अजित पवार विमान अपघात! पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा CCTV समोर आणा…
अजित पवार यांचा घातपात की अपघात; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
अजित दादांच्या विमान अपघाताचे गूढ वाढतच चाललं; रोहित पवार यांचा नवा खुलासा…