मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावेळी त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे भावूक झाले होते. अजित पवार यांच्या आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. आपल्या शर्टचं वरचं बटण उघडं असायचं, त्यावर ते बटण लावत जा, असे अजित पवार म्हणायचे. पण चाळीस-पन्नास वर्षानंतर कधी दादांची वरची भेट झाल्यानंतर आपण त्यांच्यासमोर हे बटण लावू. तोपर्यंत हे बटण तसंच खुलं असेल, त्यामुळे दादांची रोज आठवण येईल असे रोहित पवार म्हणाले. अजितदादांच्या अपघाताला जो कुणी दोषी असेल त्याला तुरुंगात पाठवल्याशिवाय सोडणार नाही, असेही रोहित पवार म्हणाले.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आजपासून झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी रोहित पवार यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादा पवार नावाचा जादूगार सबंध महाराष्ट्राला हसवत हसवत गेला. दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील मिश्कीलपणा गेला. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला उजाळा देत त्यांच्याबद्दल अनेक घटना सांगितल्या.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
रोहित पवार म्हणाले, “एकदा अजितदादा मला म्हणाले होते की, रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, त्या कमी कर. दादा गेले त्या दिवशी त्यांना आदरांजली म्हणून मी केस कापले. अजितदादा नेहमी मला म्हणायचे की, तुझं शारिरीक वजन वाढलंय. शारिरीक वजन कमी कर आणि राजकीय वजन वाढव. मी त्यावर फक्त हो म्हणायचो. मी अजितदादांना शब्द देतो. माझी हेअरस्टाईल अशीच ठेवेन. शारिरीक वजन कमी करेन, राजकीय वजन वाढवेन.”
अजितदादा मला म्हणायचे, वरचं बटण लावत जा. पण एक मात्र मी सांगतो, चाळीस-पन्नास वर्षानंतर मी ज्यावेळी अजितदादांना भेटायला जाईन, तोपर्यंत मी माझं बटण असंच उघडं ठेवणार. कारण हे वरचं बटण तुमची मला रोज आठवण देत राहील. एक सांगतो, चाळीस-पन्नास वर्षानंतर ज्यावेळी कधी तुमची भेट होईल, तेव्हा हा माझा लढा सुरू आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर मी ताठ मानेने उभा राहीन. त्यावेळी काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील, लढलास बरं का! या गोष्टी ऐकण्यासाठी मी हा लढा सुरू ठेवलाय. दादांच्या अपघातासाठी जो कुणी दोषी असेल, मग तो कितीही मोठा असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.”
अजित काकांसाठी आम्ही लढत राहू, मराठी माणूस दाखवून देऊ: रोहित पवार
अजितदादांच्या घातपाताचा संशय, बारामतीमधील आणखी एक गाव बंद…
अजितदादा विमान अपघात प्रकरण! रोहित पवार यांचा दिल्लीत नवा गौप्यस्फोट…
अजितदादांचा घातपात? रोहित पवार यांच्या प्रश्नांनंतर सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी…
काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय; रोक सके तो रोक लो…
अजितदादांचं विमान पायलटने मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला…
रोहित पवार यांचा पुन्हा गौप्यस्फोट; अजितदादांच्या विमानाचा पुन्हा स्फोट का झाला…
अजित दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट किती पाहा…
अजित पवार विमान अपघात! पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा CCTV समोर आणा…
अजित पवार यांचा घातपात की अपघात; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
अजित दादांच्या विमान अपघाताचे गूढ वाढतच चाललं; रोहित पवार यांचा नवा खुलासा…