मुंबईः IAS तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्रातून राजस्थानमधील सीकर येथे बदली झाल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये ही तुकाराम मुंढे यांची 26वी बदली असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यात काहीही तथ्य नसल्याचे स्वतः तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
माझा राजस्थानशी काय संबंध?, माझी बदली राजस्थानमध्ये कशी होईल? मी महाराष्ट्र कॅडरचा अधिकारी असल्याने आपली बदली महाराष्ट्रातच होऊ शकते, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन खात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चर्चेत आले होते. लाचखोरी आणि इतर भ्रष्ट कामांमुळे चर्चेत असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात आता आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे. तसा आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला होता. त्यानुसार 25 मे रोजी तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता.
तुकाराम मुंढे यांची आतापर्यंत कोणत्या ठिकाणी बदली झाली पाहा…
ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर
सप्टेंबर 2007 – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
जानेवारी 2008 – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर
मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विभाग
जुलै 2009 – सीईओ, वाशिम
जून 2010 – सीईओ, कल्याण
जून 2011 – जिल्हाधिकारी, जालना
सप्टेंबर 2012 – विक्रीकर सहआयुक्त मुंबई
नोव्हेंबर 2014 – सोलापूर जिल्हाधिकारी
मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महापालिका
मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे
फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महापालिका
नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन
डिसेंबर 2018 -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महापालिका
ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
जानेवारी 2021 – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत
सप्टेंबर – 2022 – आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
2022 – मराठी भाषा विभाग
जुलै 2022 – पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग
जून 2024 – विकास आयुक्त (असंघटित कामगार)
ऑगस्ट 2025: सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, मंत्रालय
मे 2026: आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
तुकाराम मुंढे यांनी मोर्चा वळवला खाद्य तेलाकडे; भेसळ केल्यास 10 लाखापर्यत दंड…
…काम जमत नसेल तर राजीनामे देऊन घरी जा: तुकाराम मुंढे
संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
हॉटेलधारकांनो ग्राहकांसमोर लगेच पाण्याच्या बाटल्या ठेवू नका; तुकाराम मुंढे