हॉटेलधारकांनो ग्राहकांसमोर लगेच पाण्याच्या बाटल्या ठेवू नका; तुकाराम मुंढे

tukaram-mundhe
Share

मुंबई : राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, धाबे, इटरीज आणि ज्या ठिकाणी अन्न प्रक्रिया केली जाते त्यांनी नियमांचे पालन करणं बंधनकारक आहे. त्याचं जर उल्लंघन केलं तर त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही, असा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. हॉटेल्सनी ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी हे मोफत देणं गरजेचं आहे, तसा बोर्ड त्यांनी समोर लावावा, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्यातील नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावं यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी सर्वांनीच नियमांची अंमलबजावणी करावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल. राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर सर्व ठिकाणी ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी हे मोफत उपलब्ध करण्यात यावे, बाटलीबंद पाणी देऊ नये, तसा बोर्ड त्यांनी समोर लावावा. जर एखाद्या ग्राहकाने या व्यतिरिक्त बाटलीबंद पाणी मागितलं तर त्याला ते द्यावं. जर याची अंमलबजावणी केली नाही तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तुकाराम मुंडे यांनी दिला आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

तुकाराम मुंढे म्हणाले, “ग्राहकांनी हॉटेलमध्ये आल्यानतंर त्यांना सुरक्षित पाणी, द्रवसाधन, टॉवेल, साबण देणं बंधनकारक आहे, त्यामुळे ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित राहते. अन्नात कुठेही भेसळ होऊ नये यासाठी काही पावलं उचलण्यात येतात, त्याची जबाबदारी राज्याच्या एफडीए आयुक्तांवर असते. 23 जून रोजी एक आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इटरिज यांनी नियम पाळणे बंधनकारक असेल. अन्न व सुरक्षा मानके यानुसार त्यांनी रजिस्ट्रेशन करावं. अन्न उत्पादन मानके, 2011 याच्यासह अनेक नियमांची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. तसेच शाळेच्या मुलांच्या सुरक्षेसाठी नियमांची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे.”

किचन कसं असावं…
भिंती आणि फ्लोअर हा टाईल्सचा असावा.
त्या टाईल्स वॉशेबल असाव्यात.
त्यातून पाणी झिरपू नये.
हे करताना पुरेशी हवा खेळती हवी.
किचनला एक्झॉस्ट असावा.
कच्चा मालासाठी वेगळा सेक्शन असावा.
स्वयंपाक तयार करण्यासाठी वेगळा सेक्शन
कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे असावे.
शाकाहारी आणि मांसाहारी अन्न वेगवेगळे ठेवावेत.
इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवावेत.
पेस्ट कंट्रोल नियमित करावं.
अन्नाच्या ठिकाणी किडे, झुरळ, पाल, उंदरांचा प्रादुर्भाव नसावा.
ग्राहक हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांच्यासाठी पाणी, हँडवॉश, साबण, टॉवेल ठेवण्यात यावेत.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनातही तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या धडाक्यावर चर्चा झाली. तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात यावी यासाठी इंटरनॅशनल ड्रग माफियांनी 250 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देताना, मला हे प्रकरण माहिती नाही, अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी दिली.

मोठी खळबळ! तुकाराम मुंढे यांची विकेट काढण्यासाठी 250 कोटींची सुपारी…

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्याकडून महत्त्वाची जबाबदारी घेतली काढून…

पत्रकार संदिप कद्रे यांच्या ईमेलची तुकाराम मुंढे यांनी घेतली तत्काळ दखल; हॉस्पिटल्सकडे वळवला मोर्चा…

वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे वळवली तुकाराम मुंढे यांनी वक्रदृष्टी; मोठा इशारा…

IAS तुकाराम मुंढे यांची २१ वर्षात २५वी बदली; पाहा आता कुठे नियुक्ती…

तुकाराम मुंढे यांना थेट निलंबित करण्याची मागणी…

अन्नातील आणि औषधातील भेसळीच्या तक्रारासाठी टोल फ्री नंबर जारी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *