मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्याकडून महत्त्वाची जबाबदारी घेतली काढून…

tukaram-mundhe
Share

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून धडाडीची कामगिरी करणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्यासंबंधी एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडे असलेल्या परभणीच्या पालक सचिवपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे आता परभणीच्या पालक सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव असताना, 23 फेब्रुवारी 2026 रोजी तुकाराम मुंढे यांच्याकडे परभणीच्या पालक सचिवपदाची जबाबदारी देण्यात होती.

तुकाराम मुंढे हे या आधी मंत्रालयात सचिव असताना त्यांच्याकडे परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता तुकाराम मुंढे हे सचिव नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेली पालक सचिवपदाची जबाबदारी आता दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे आता परभणीच्या पालक सचिवपदाची जबाबदारी असेल. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे सध्या राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

एखाद्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाकडून पालक सचिवपदी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्तील केली जाते. हे पद महत्त्वाचं मानलं जातं. त्या माध्यमातून शासनाचे धोरणात्मक निर्णय, कल्याणकारी योजना यांची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पालक सचिवाकडे असते. संबंधित जिल्ह्याच्या पालक सचिवाला वर्षातून चार वेळा किंवा तीन महिन्यातून किमान एकदा दौरा करून विकासकामांचा आढावा घ्यावा लागतो. त्या जिल्ह्याच्या विकासासाठी नेमके उपाय सूचवण्याची, तसा अहवाल सूचवण्याची जबाबदारी पालक सचिवावर असते.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी घेताच धडाडीचे आयएएस अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करत त्यांनी अनेक ठिकाणच्या भेसळ उघडकीस आणल्या. तसेच त्यांनी या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे राज्यभरात भेसळ करणाऱ्या व्यापारी आणि दलालांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

पत्रकार संदिप कद्रे यांच्या ईमेलची तुकाराम मुंढे यांनी घेतली तत्काळ दखल; हॉस्पिटल्सकडे वळवला मोर्चा…

वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे वळवली तुकाराम मुंढे यांनी वक्रदृष्टी; मोठा इशारा…

IAS तुकाराम मुंढे यांची २१ वर्षात २५वी बदली; पाहा आता कुठे नियुक्ती…

तुकाराम मुंढे यांना थेट निलंबित करण्याची मागणी…

अन्नातील आणि औषधातील भेसळीच्या तक्रारासाठी टोल फ्री नंबर जारी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *