मुंबईः अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यापासून भेसळखोर आणि साठेबाजांना सळो की पळो करुन सोडणारे डॅशिंग सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची वक्रदृष्टी आता वडापाव आणि समोसा विक्रेत्यांकडे वळली आहे.
बाजारपेठेत मिळणाऱ्या वडापाव आणि समोसा ग्राहकांना बांधून देण्यासाठी सर्रासपणे वर्तमानपत्रांच्या कागदाचा वापर होतो. मात्र, यापुढे वडापाव, समोसा आणि तत्सम खाद्यपदार्थ वर्तमानपत्रांच्या कागदात गुंडाळून विकता येणार नाही, असा आदेश अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने दिला आहे. समोसा आणि वडापाव विकणाऱ्यांना लवकरात लवकर वर्तमानपत्राच्या कागदाला पर्याय शोधावा लागणार आहे. तसे न केल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई अटळ मानली जात आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
तुकाराम मुंढे यांनी चार्ज घेतल्यापासून अन्न व औषध विभागाने राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळीचा माल जप्त केला आहे. संबंधित विक्रेत्यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा वडापाव आणि समोसा विक्रेत्यांकडे वळवला आहे.
वर्तमानपत्रात -खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) रडारवर आले आहेत. खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विकू नका, अशी सक्त ताकीद अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागामार्फत सर्व विक्रेत्यांना जारी केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पनीर विक्रेते, औषध विक्रेते, गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करीत असताना अनेक ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून खाद्यपदार्थ खासकरून वडापाव-भजीपाव दिले जात असल्याचे तुकाराम मुंढे यांच्या लक्षात आले. वास्तविक वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकण्यास पूर्वीपासून बंदी आहे. वर्तमानपत्रांच्या छपाईच्या शाईमधील शिसे, झिंक, कॅडमियन मानवी आरोग्यास घातक असल्याने वडापावसारखे पदार्थ वर्तमानपत्रात बांधून देऊ नयेत, अशा मागणीच्या ठरावाची सूचना शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक आशीष चेंबूरकर यांनी पालिकेच्या महासभेत मांडली होती. ती मंजूरही झाली होती.
वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ विकण्यास बंदी केल्यामुळे आता खाद्यपदार्थ खासकरून वडापाव, भजीपाव, समोसे, सॅण्डवीच यांच्यासारखे अन्य खाद्यपदार्थ बांधण्यासाठी अलीकडच्या काळात बटर पेपरचा वापर होतो. हे खाद्यपदार्थ बटर पेपरमध्ये ठेवून मग वर्तमानपत्रात बांधले जातात. हल्ली अनेक ठिकाणी रस्त्यांवरच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर आणि हॉटेलमध्येही इडली, मेदूवडा, मसाला डोसा असे खाद्यपदार्थ सिल्व्हर फॉईल किंवा बटर पेपरमध्ये बांधून दिले जातात.
अन्नातील आणि औषधातील भेसळीच्या तक्रारासाठी टोल फ्री नंबर जारी…
IAS तुकाराम मुंढे यांची २१ वर्षात २५वी बदली; पाहा आता कुठे नियुक्ती…