मुंबईः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
राज्यसभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षानं प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात आली. अमरसिंह पंडित हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते. मात्र अखेर राजेंद्र जैन यांची राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज भरुन बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी आपल्याला राज्यसभेची उमेदवारी आणि पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल अप्रत्यक्ष आणि सूचकपणे का होईना नाराजी व्यक्त केली. तुमच्यावर अन्याय झाला आहे का, असा प्रश्न विचारल्यावर, ‘अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नही तो कल , कल नही तो परसो, असे आमचे धोरण आहे. ‘मैं कबड्डी का खिलाडी हूँ, शतरंज का खिलाडी नहीं हूँ’, अशी सूचक टिप्पणी केली. दरम्यान, राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीवर आणि छगन भुजबळ यांच्या नाराजीवर शरद पवारांना विचारले असता, छगन भुजबळांना डावलेले आहे की नाही. मला माहिती नाही. माझी कोणाशी चर्चा नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
सुप्रिया सुळे म्हणाल्या, दुसऱ्याच्या घरात मी कशाला बघू? पण छगन भुजबळ यांच्याबद्दल माझ्या मनात आदर, प्रेम राहिलं आहे. त्यांनी शून्यातून खूप मोठं विश्व उभं केलं. त्यांनी आदरणीय पवार साहेबांसोबत ते अनेक वर्षे ते सुख-दु:खात राहिलेले आहे, याची जाणीव मला आहे. मी त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहीन. ते दुखावले असतील मला याची माहिती नाही. पण ते आयुष्याच्या ज्या टप्प्यावर भुजबळ उभे आहेत, त्यांनी जो त्याग केलाय, कष्ट केलेत, त्यानंतर त्यांना दिल्लीला यायचं असेल त्यामध्ये गैर काय? आम्ही एकत्र असतानाही शरद पवारांचा फार आग्रह होता, भुजबळांचं नेृतृत्व फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व मिळालं पाहिजे, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. भारताला एक मोठा नेता मिळू शकला असता, पार्लामेंटमध्ये त्यांची उत्तम भाषण करण्याची पद्धत, त्यांचे विचार….ते दिल्लीत आले असते तर देशामध्ये एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं. पण शेवटी तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. पण भुजबळ दिल्लीला आले असते तर मला मनापासून आनंद झाला असता. त्यांच्या भाषणांमधून आम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळाले असते, एवढाच माझा स्वार्थ होता.’
राजेंद्र जैन कोण आहेत…
राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील एक प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि एकेकाळचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करत असतानाच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सक्रिय वावर आणि प्रभाव वाढत गेला. विधान परिषद सदस्य (माजी आमदार): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या पक्षकार्याची दखल घेत त्यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर पाठवले होते. 2016 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परिणय फुके यांच्याकडून पराभव झाला होता.
निवडून येण्यासाठी 50 कोटीचा आकडा बघून उमेदवार कचरले : रोहित पवार
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! शिंदे गटाला संजय राऊत यांची खुली ऑफर…