महाराष्ट्रात लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयांनी अवघ्या निवडणूक फिरली पण बिहारमध्ये…

Bihar-Election
Share

पाटणा : बिहार निवडणुकीच्या तोंडावर 75 लाख महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा झाले. ही रक्कम मुख्यमंत्री महिला रोजगार योजना (CMWES) अंतर्गत देण्यात आली. महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आणि लघु उद्योग चालवण्यासाठी आर्थिक मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आता हीच रक्कम बिहारमध्ये टर्निंग पाँईट ठरल्याची चर्चा आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं सत्ता राखण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. बिहारमधील महिलांना ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण द्वारे थेट महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. ही योजना 29 ऑगस्ट 2025 रोजी सुरू करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती व्हर्च्युअल पद्धतीने सुरू केली. डिसेंबर 2025 पर्यंत शक्य तितक्या पात्र महिलांना या योजनेत समाविष्ट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा तारीख 10 ऑक्टोबर 2025 होती. निवडणूक आयोगाने या तारखेला अधिकृतपणे निवडणुका जाहीर केल्या, त्यानंतर उमेदवारांचे नामांकन, नामांकन पत्रांची छाननी आणि माघार घेण्याच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. मतदान दोन टप्प्यात झाले. पहिला टप्पा 6 नोव्हेंबर 2025 रोजी आणि दुसरा टप्पा 11 नोव्हेंबर 2025 रोजी. निवडणुकीचे निकाल आज 14 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर झाले.

Buy Political Social Media Book WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
WhatsApp : 93712 69949

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *