नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिकेने इराणविरोधात पुकारलेल्या युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्याने इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. होर्मुझमधील वाहतूक बंद झाली आहे. मात्र, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने डिझेल खरेदी करण्यासाठी आता मर्यादा निश्चित केली आहे. यामुळे साठेखोरी करणाऱ्यांना आळा बसेल असे म्हटले जात आहे.
देशात इंधनाची साठेबाजी होऊन टंचाई स्थिती निर्माण होऊ नये यासाठी सरकारने पावले उचलण्यास मदत केली आहे. सरकारने एका आता प्रति व्यक्ती किती डिझेल खरेदी करता येईल, याचे आदेश जारी केले आहेत. आता एका व्यक्तीला २०० लीटरपेक्षा अधिक डिझेल खरेदी करता येणार नाही. केंद्र सरकारने आज (शुक्रवार) किरकोळ पेट्रोल पंपांवरून हाय स्पीड डिझेल (HSD) च्या विक्रीवर मर्यादा आणण्याचा मोठा आदेश जारी केला आहे. नव्या नियमांनुसार, आता कोणत्याही ग्राहकाला एका दिवसात जास्तीत जास्त २०० लीटर डिझेलच विकले जाऊ शकणार आहे. म्हणजेच, प्रत्येक ग्राहकासाठी प्रतिदिवस डिझेल खरेदीची ही सर्वोच्च मर्यादा असणार आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
डिझेलची साठेबाजी, अनावश्यक साठवणूक आणि संभाव्य काळाबाजार रोखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत काही भागांमध्ये इंधनाची अतिरिक्त खरेदी आणि साठा वाढण्याची भीती निर्माण झाली होती, हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सरकारी आदेशानुसार, ज्या ग्राहकांना व्यावसायिक किंवा औद्योगिक कामासाठी मोठ्या प्रमाणावर डिझेलची आवश्यकता असते, त्यांनी इंधनाची खरेदी त्यांच्या अधिकृत सुविधा, डेपो किंवा निश्चित केलेल्या पंपांवरूनच करावी लागणार आहे. मोठ्या प्रमाणावर इंधन खरेदी करणाऱ्या ग्राहकांमुळे किरकोळ (रिटेल) पेट्रोल पंपांच्या नेटवर्कवर अतिरिक्त ताण पडू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की ही एक तात्पुरता निर्णय आहे. हा आदेश लागू झाल्यापासून ही मर्यादा कमाल ९० दिवसांपर्यंत कायम असेल. आवश्यकतेनुसार परिस्थितीचा आढावा घेऊन यामध्ये बदल केला जाऊ शकतो. संबंधित तेल विपणन कंपन्या (OMCs) आणि पेट्रोल पंप चालकांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार…
पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नियम बदलणार…
CNG दरात 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले…
महागाईचा झटका! CNG च्या दरात मोठी वाढ, पाहा नवे दर…
महागाईचा भडका! देशात पेट्रोल-डिझेलचे दर 10 दिवसांत चौथ्यांदा वाढले; पाहा नवीन दर…
महागाईचा भडका! दहा दिवसांत तिसऱ्यांदा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर…
पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’ नंतर सातबारा दाखवा आणि डिझेल घ्या….
पेट्रोल-डिझेलच्या दरात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, पाहा नवीन दर…
महागाईचा भडका! देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले; पाहा नवीन दर…
राहुल गांधी यांची पोस्ट! पहिला वार गॅसवर आता नंबर पेट्रोल, डिझेलचा…
पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; ही नौटंकी आहे : राहुल गांधी