पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; ही नौटंकी आहे : राहुल गांधी

Rahul-Gandhi
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इटलीच्या दौऱ्यावर असून, त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांची भेट घेतली. यानंतर या दोघांनी रोम शहरात एक खास फोटोसेशन केले. मोदी-मेलोनींचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेलोनी यांच्यासोबत कोलॅब करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी हे इटलीच्या पंतप्रधानांना त्यांच्या नावाशी सार्धम्य असलेली मेलेडी चॉकलेटस् देताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये दोघेही खळाळून हसताना पाहायला मिळत आहेत. याच व्हिडीओवरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशाच्या डोक्यावर आर्थिक वादळ घोंघावत असताना आपले पंतप्रधान इटलीत चॉकलेटस वाटण्याच मश्गुल आहेत. देशातील शेतकरी, तरुण, महिला, मजूर आणि लहान शेतकरी दु:खात आहेत. दोन महिन्यांपासून देशात बेरोजगारी वाढतेय हे मी सांगतोय, पण माझी खिल्ली उडवली जात आहे. पंतप्रधान मोदी हसत आहेत, रिल्स बनवत आहेत आणि भाजपचे लोक टाळ्या वाजवत आहेत. या नेतृत्व म्हणत नाहीत, ही नौटंकी आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

राहुल गांधी यांनी बुधवारी रायबरेली येथे झालेल्या सभेतही पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. आता अदानी आणि अंबानी मोदी देशाला वाचवू शकत नाहीत. आता देशातील शेतकरी, मजूर, तरुण देश वाचवू शकतात, पण यांनी तुमचे हात बांधून टाकले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या संपवल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आता चॉकलेटं वाटत फिरण्याऐवजी शेतकऱ्यांना खतपुरवठा कसा होईल, याकडे पाहायला हवे. अंबानी देशातील देशातील तेल बाहेर निर्यात करत आहेत. हे तेल लोकांना हवे आहे. हे तेल जनतेला द्या, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही भारतीय संविधानावर आक्रमण करत आहेत. अदानी, अंबानी यांना देशाची संपत्ती देणे, हे आक्रमण आहे. देशातील विद्यापीठांमध्ये सर्व ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना कुलगुरुपदी आणून बसवले जात आहे. निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्था नष्ट केली जात आहे. अशाप्रकारे संविधानावर आक्रमण करणाऱ्यांना गद्दार म्हणतात. म्हणून मी मोदी-शाह यांना गद्दार म्हणतो. मी त्यासाठी कधीही घाबरत नाही. मी कधी माफी मागणार नाही,मी तुम्हाला घाबरत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांची पोस्ट! पहिला वार गॅसवर आता नंबर पेट्रोल, डिझेलचा…

राहुल गांधी यांच्या वक्तव्याने संसदेत पिकला हशा…

राहुल गांधी यांच्या भाषणावेळी जोरदार राडा, सत्ताधारी विरोधक भिडले…

मोदीजी हा उत्तर कोरिया नाही भारत आहे; राहुल गांधी यांचा हल्लाबोल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *