नवी दिल्ली : सरकारने आणलेले विधेयक महिला आरक्षण विधेयक नाही. महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्ये मंजूर झाले होते. या विधेयकाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांकडून देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे. पण हे राष्ट्रविरोधी विधेयक पास होणार नाही, आम्ही दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले. त्याचवेळी महिला आरक्षणाला विधेयकाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे, लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेला आमचा विरोध असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांच्या भाषणावेळी जोरदार राडा झाला.
संसदेच्या विशेष अधिवेशनात राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयक, लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर भाषण केले. त्यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी अनेक वेळा व्यत्यय आणला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना अनेकवेळा भाषणादरम्यान हस्तक्षेप करावा लागला. राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जादूगाराची उपमा दिल्याने सत्ताधाऱ्यांनी यावर आक्षेप नोंदवला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र राहुल गांधी यांनी मूळ मुद्द्यावर भाष्य करीत दक्षिणेकडील राज्यांचे महत्त्व कमी होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
सरकारने आणलेले विधेयक हे महिला आरक्षण विधेयक नाही. महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्ये मंजूर झाले होते. या विधेयकाच्या माध्यमातून देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहे. हे विधेयक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या विरोधात असून त्यांचे हक्क काढून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार घाबरले आहे. हे काम आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये आधीच झाले आहे आणि आता सरकारला तेच देशभरात करायचे आहे. या विधेयकाचा महिला सक्षमीकरणाशी काहीही संबंध नाही. तुम्ही सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करत आहात. हे विधेयक देशद्रोही आहे. आम्ही सरकारला हे करू देणार नाही. दक्षिण आणि उत्तर भारतामध्ये भेदभाव केला जातो. निर्णयप्रकियेत दलित आणि आदिवासींचा सहभाग कमी होत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
सरकारला सत्ता गमावण्याची भीती वाटते. सरकारला सत्य आवडत नाही. भाजपला माहित आहे की ते हे विधेयक प्रत्यक्षात मंजूर होऊ शकत नाहीत. हे विधेयक देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा एक प्रयत्न आहे आणि पंतप्रधानांना असा संदेश द्यायचा आहे की ते महिलांच्या बाजूने आहेत. परंतु मला देशाला सांगायचे आहे की हे विधेयक महिला आरक्षणाशी संबंध नाही., महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्येच मंजूर झाले आहे.
मोदीजी हा उत्तर कोरिया नाही भारत आहे; राहुल गांधी यांचा हल्लाबोल…
Video: राहुल गांधी यांनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेल आली समोर…