नवनीत राणा हिंदू धर्मियांना बरबाद करताय, त्यांच्यावर पोक्सो दाखल करा…

navneet-rana
Share

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या लैंगिक शोषण प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणाला धार्मिक रंग दिल्याचा आणि पीडित मुलींची ओळख उघड केल्याचा ठपका ठेवत, त्यांच्यावर ‘पोक्सो’ (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्य अल्पसंख्याक आयोगाने केली आहे.

राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, नवनीत राणा यांनी अल्पवयीन मुलींची माहिती उघड केली आहे. त्या गुन्ह्याअंतर्गत त्यांच्यावर पोक्सो दाखल व्हावा. परतवाडा प्रकरणात ज्या आठ अल्पवयीन मुली पीडित आहे, त्यातील एक नागपूरची, तीन अमरावती व चार परतवाडा येथील मुली आहे. सर्व मुस्लीम समाजाच्या मुली आहेत. त्यामुळे माजी खासदार नवनीत राणा यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करावी, या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. परतवाडा प्रकरणाला नवनीत राणा या विनाकारण धार्मिक तेढ उत्पन्न करत असून वस्तुस्थितीपासून जनतेची दिशाभूल करत आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

अल्पसंख्यांक आयोगाच्या टीमने त्या भागाचा दौरा केला. त्यावेळी तिथल्या पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली. त्यामध्ये मुस्लीम समाजाच्या 8 मुली पीडित असल्याच्या आढळल्या आहेत. 180 हिंदू मुली वगैरे या सगळ्या अफवा होत्या. दंगा भडकवण्यासाठी असे केले जात असावे. तिथले पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असेही प्यारे खान यांनी म्हटले आहे.

मानव सुगंधे हा अयानला फ्लॅट उपलब्ध करून देत होता. दोन मुलींचे विडिओ आहेत, इतर सहा मुलींचे मात्र केवळ फोटो आहेत. नवनीत राणा महाराष्ट्राला, देशाला, हिंदू धर्मियांना बरबाद करत आहेत. मला नागपुरात बसून कळतं की, तिथे हिंदू मुली नाहीत, मग तुम्ही का असं खोटं बोलताय? आरोपीविरोधात पॉक्सोअंतर्गत कारवाई केलीच जाईल. नवनीत राणा या शहरात दंगे भडकवण्याचं काम करत आहेत. तुम्ही हिंदूंना बरबाद करण्याचं काम केले. पंतप्रधान मोदी, मोहन भागवत देशाला जोडण्यासाठी प्रयत्न करता आहेत आणि तुम्ही देशाला तोडण्याचं काम करत आहात. तुम्हीच पाकिस्तानला निघून जा. या देशात मुस्लीम सुरक्षित आहेत, असे म्हणत त्यांनी नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

नाशिकच्या राजकारणात एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे दाखल; मोठी खळबळ…

धक्कादायक मागणी! स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांची नावं, फोटो, Video सार्वजनिक करा…

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *