अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…

rupali-chakankar
Share

मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळीकतेमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेल्या रुपाली चाकणकर यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळे आरोप सुरू आहेत. त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची पोलिसांनी तब्बल आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली. यानंतर रुपाली चाकणकर यांनी खरात प्रकरणात आमचा कोणताच सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले, त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी संबंध महाराष्ट्राला दाखवले आणि आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले. मात्र आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर आणि माझ्या परिवारावर बेछूट आणि कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येत आहे. याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले.’

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले, हे घडवून आणण्यामागे कुणाचे ‘सौजन्य’ होते हे समोर आले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही, हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे . तरीही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले, कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

यानिमित्ताने एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. केवळ तर्कवितर्क, अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय, बदनाम केले जात आहे ,हे अत्यंत खेदजनक आहे. मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आले आहे. खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात आणि इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही. शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच, हा माझा दृढ विश्वास आहे, असे स्पष्टीकरण रुपाली चाकणकर यांनी दिले आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ! सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका…

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना पहिला धक्का…

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना चौकशीला कधी बोलवणार…

खळबळजनक आरोप! रूपाली चाकणकर यांचे अशोक खरात याला 177 कॉल्स…

अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी बोलवताच रुपाली चाकणकर म्हणाल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *