राजकीय वर्तुळात खळबळ! सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका…

rupali-chakankar
Share

पुणे: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरातच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडे (SIT) बीडमधील एका व्यक्तीने गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याचे म्हटले आहे. या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात आणि पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने थेट SIT कडे धाव घेत ही तक्रार नोंदवली आहे. अशोक खरात प्रकरणाशी संबंधित धागेदोरे तपासले जात असताना, या तक्रारीने तपासाची दिशा अधिक गुंतागुंतीची केली आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा या तक्रारदाराने केला आहे. तक्रारीत तथ्य किती आणि खोडसाळपणा किती, याचा शोध SIT घेणार आहे. राजकीय आकसातून ही तक्रार करण्यात आली आहे का? या अंगानेही पोलिस तपास होण्याची शक्यता आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात फसवणूक झालेल्या महिला आणि इतर पीडितांसाठी SIT ने हेल्पलाईन क्रमांक आणि इतर माध्यमे उपलब्ध करून दिली आहेत. या माध्यमातून दररोज विविध प्रकारच्या तक्रारींचा ओघ सुरू आहे. यामध्ये केवळ आर्थिक फसवणूक किंवा लैंगिक शोषणाचेच गुन्हे नाहीत, तर अनेक कौटुंबिक वादा संदर्भात देखील तक्रारी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणाचा मुख्य तपास करत असतानाच, दररोज येणाऱ्या या शेकडो तक्रारींची सत्यता पडताळून पाहणे हे SIT समोर मोठे आव्हान ठरत आहे.

अशोक खरात स्वतःच्या भवितव्याबाबतच अंधारात असल्याचे चित्र समोर आले आहे. चौकशीदरम्यान “मी इथून बाहेर पडेल असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे,” अशी प्रतिक्रिया अशोक खरातने दिल्याची माहिती आहे.

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना पहिला धक्का…

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना चौकशीला कधी बोलवणार…

खळबळजनक आरोप! रूपाली चाकणकर यांचे अशोक खरात याला 177 कॉल्स…

भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा; रुपाली चाकणकर यांची बहिण अन्…

अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी बोलवताच रुपाली चाकणकर म्हणाल्या…

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना समन्स; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *