रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा…

rupali-chakankar
Share

मुंबई : नाशिकचा भोंदूबाब अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. खरातला गुरू मानणाऱ्या रुपाली चाकणकरांवर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव होता. आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी अशी आपली मागणी असल्याचे रुपाली चाकणकरांनी म्हटले आहे.

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘खरात प्रकरणी आपण आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्याशी संबंधित कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात आपला दुरान्वयेही संबंध नाही. पोलीस तपासात या गोष्टी समोर येतीलच. हा तपास पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे केली आहे.’

शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातवर कारवाई झाली. अशोक खरातसोबत रुपाली चाकणकर यांचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर चाकणकरांवर टीका होऊ लागली. चाकणकर या अशोक खरातला गुरू मानायच्या, त्यामुळे या आधीच्या काही प्रकरणामध्ये चाकणकरांनी राजकीय हस्तक्षेप केल्याचे समोर आले होते.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधी पक्षांनी दबाव टाकला. तसेच राष्ट्रवादीतील एका गटानेही ही मागणी केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आधी रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे.

दरम्यान, रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका या ट्रस्टच्या संचालिका होत्या. त्यावरुन त्यांच्यावर आरोप होऊ लागले. अशोक खरात प्रकरणी जे कुणी दोषी असतील, अशोक खरातशी ज्यांचे कुणाचे संबंध असतील त्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तसेच अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालकांचीही चौकशी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे रुपाली चाकणकर यांचीही चौकशी होण्याची शक्यता असून त्यांची अडचण वाढणार आहे.

मोठा आरोप! रुपाली चाकणकर यांनी असंख्य महिलांना अशोक खरात याच्याकडे नेलं…

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांचीही होणार चौकशी…

रूपाली चाकणकर यांच्या बोटाला दुखापत कशी झाली? सीसीटीव्हीमध्ये मिळेल पाहायला…

गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…

रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…

मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *